‘गोलमाल ४’साठी बेबो करणार गाणे?
By Admin | Updated: August 25, 2016 02:26 IST2016-08-25T02:26:47+5:302016-08-25T02:26:47+5:30
दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच ‘गोलमाल’ चा चौथा भागही घेऊन येतो आहे

‘गोलमाल ४’साठी बेबो करणार गाणे?
दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच ‘गोलमाल’ चा चौथा भागही घेऊन येतो आहे. करिना कपूर खान ही गरोदर असल्याने तिच्या जागेवर आता कुणाला घ्यायचे? यावर रोहित शेट्टी सध्या विचार करत आहेत. जानेवारी २०१७ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण, चित्रपटाची टीम मात्र करिनाला मिस करणार आहे. रोहितच्या मते, करिनाला परत चित्रपटासाठी बोलावून घेणे फारसे अवघड नाही. पण सध्या तरी बेबोचे केवळ एक गाणे चित्रपटात दिसणार आहे. बेबो चित्रपटात नाही. पण तिचे एक गाणे तर आपल्याला नक्की पाहायला मिळणार. शेवटी हेही नसे थोडके !!