जे बात! 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवी आणि दबंग खानचा धमाल डान्स, प्रभु देवा करणार कोरियोग्राफी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 04:48 PM2022-05-04T16:48:37+5:302022-05-04T16:51:13+5:30

साऊथमधला आगामी चित्रपट 'गॉडफादर' रिलीजपूर्वीच चर्चेत राहिला आहे. चित्रपटात चिरंजीवी आहे. त्याच्यासोबत अभिनेता सलमान खानही दिसणार आहे

godfather salman khan and chiranjeevi dance song in film prabhudeva will choreograph | जे बात! 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवी आणि दबंग खानचा धमाल डान्स, प्रभु देवा करणार कोरियोग्राफी

जे बात! 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवी आणि दबंग खानचा धमाल डान्स, प्रभु देवा करणार कोरियोग्राफी

googlenewsNext

साउथ इंडस्ट्रीचा आगामी चित्रपट 'गॉडफादर' रिलीजपूर्वीच चर्चेत राहिला आहे. चित्रपटात चिरंजीवी आहे. त्याच्यासोबत अभिनेता सलमान खानही दिसणार आहे. सलमान खानचा हा पहिलाच साऊथचा सिनेमा असणार आहे, त्यामुळे चाहते खूप उत्सुक आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित एक माहिती समोर आली आहेह. 'गॉडफादर'मध्ये सलमान खान आणि चिरंजीवी यांचे एक डान्स सॉंग असणार आहे. ज्याची कोरियोग्राफी प्रभुदेवा करणार आहे.

संगीतकार एस थमन यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सलमान खान आणि चिरंजीवीच्या डान्स गाण्याबद्दल सांगितले आहे. या फोटोत एस थमनसोबत चिरंजीवी, प्रभुदेवा आणि दिग्दर्शक मोहन राजा दिसत आहेत. या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे, '' प्रभुदेवा सलमान खान आणि चिरंजीवी यांच्यासोबत अॅटम बॉम्बिंग डान्स गाणे कोरिओग्राफ करणार आहे.''  सलमान खान आणि चिरंजीवी एकत्र स्क्रिन शेअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि आता यात दोन्ही स्टार्सच्या डान्स गाण्याचाही समावेश करण्यात आला आहे.

सलमान खान हा बॉलीवूडचा दबंग आहे, ज्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आता सलमान खान आपला स्वॅग टॉलिवूडमध्ये दाखवणार आहे. सलमान खान 'गॉडफादर'मधून टॉलिवूड इंडस्ट्रीत डेब्यू करत आहे. त्याचबरोबर 'गॉडफादर' हा चिरंजीवीचा १५३ वा चित्रपट आहे. तो शेवटचा 'आचार्य'मध्ये दिसला होता.

'गॉडफादर'चे दिग्दर्शन मोहन राजा करत आहेत. हा मल्याळम सुपरहिट चित्रपट 'लुसिफर'चा रिमेक आहे. पृथ्वीराज सुकुमारन 'ल्युसिफर' चित्रपटातही दिसला होता. असा दावा केला जात आहे की, 'गॉडफादर' चित्रपटात सलमान खानही अशीच भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि चिरंजीवी व्यतिरिक्त नयनतारा, सत्यदेव कंचराना आणि जय प्रकाश सारखे कलाकार दिसणार आहेत.

Web Title: godfather salman khan and chiranjeevi dance song in film prabhudeva will choreograph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.