गर्लफ्रेंडवरुन सैराटच्या परश्याची मांजरेकरांनी घेतली शाळा
By Admin | Updated: March 7, 2017 20:22 IST2017-03-07T20:22:36+5:302017-03-07T20:22:36+5:30
लाखो तरुणींची दिल की धडकन असलेला परश्या उर्फ आकाश ठोसर प्रेमात पडला आहे.

गर्लफ्रेंडवरुन सैराटच्या परश्याची मांजरेकरांनी घेतली शाळा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - सैराटमधील झिंगाट परश्याने संपूर्ण देशालाच वेड लावले आहे, ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही, पण लाखो तरुणींची दिल की धडकन असलेला परश्या उर्फ आकाश ठोसर प्रेमात पडला आहे. सैराटनंतर प्रकाश झोतात आलेला आकाश ठोसर सध्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटामध्ये काम करत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत महेश मांजरेकरांचा दरारा सर्वश्रुत आहे. चित्रपटसृष्टीतील कोणतीच गोष्ट त्यांच्यापासून लपून राहत नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाची इत्थंभूत माहिती मांजरेकरांकडे असते. सैराट फेम आकाश ठोसरच्या सुरु असलेल्या अफेअरची कानोकान खबर लागताच मांजरेकरांनी आकाशची चांगलीच शाळा घेतली.
आकाशच्या वाढत्या फोनकॉल्सची खबरबात घेत सध्या तो काय करतो याचं गुपित मांजरेकरांनी उलगडलं आहे. आकाशचं अफेअर कोणासोबत आणि कुठे सुरु आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला 19 मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. कारण झी टॉकीजवर रविवार 19 मार्चला प्रसारित होणाऱ्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? 2017 या पुरस्कार सोहळ्यामध्ये आकाश ठोसरची गर्लफ्रेंड कोण हे त्याने स्वत खुलासा केला आहे.
दरवर्षी महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्यात महेश मांजरेकर कलाकारांची चांगलीच शाळा घेतात, किंबहुना हा पुरस्कार सोहळा महेश मांजरेकरांच्या स्पूफमुळेचं अधिक रंगतदार होतो. यंदाही हा सोहळा अनेक आकर्षक कलाविष्कारांनी चांगलाच रंगला.