गिरीश कर्नाड यांचे मराठीत पुनरागमन
By Admin | Updated: October 28, 2015 23:03 IST2015-10-28T23:03:05+5:302015-10-28T23:03:05+5:30
गिरीश कर्नाड यांच्या नावाचे गारूड साहित्य, नाट्य आणि चित्र कलाकृतींंमध्ये आजही कायम आहे. चेन्नई, शिकागो याठिकाणी प्रोफेसर म्हणून काम केल्यानंतर नाटकांकडे वळलेल्या

गिरीश कर्नाड यांचे मराठीत पुनरागमन
गिरीश कर्नाड यांच्या नावाचे गारूड साहित्य, नाट्य आणि चित्र कलाकृतींंमध्ये आजही कायम आहे. चेन्नई, शिकागो याठिकाणी प्रोफेसर म्हणून काम केल्यानंतर नाटकांकडे वळलेल्या कर्नाड यांची १९६१ नंतर ययाती, तुघलक अग्नी और बरखा, नागमंडळ, अंजू मल्लिगे अशी अनेक नाटके गाजली. ‘संस्कार’ या कन्नड चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात झाली. कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला ‘उत्सव’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, मराठी अशा ७० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. १९८२ मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. आता तब्बल ३३ वर्षांनंतर ‘सरगम’ या मराठी चित्रपटात त्यांचे पुनरागमन होत आहे. अहमदनगर-अकोल्याच्या जवळील भंडारदरा येथे सुरू होणाऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये ते लवकरच सहभागी होणार असल्याचे निर्माता एम. के. धुमाळ आणि दिग्दर्शक शिव कदम यांनी सांगितले.