ये दोस्ती... हम नही छोडेंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 01:14 IST2016-03-04T01:14:59+5:302016-03-04T01:14:59+5:30
दोन व्यक्तींच्या नात्यातील प्रेमाचे बंध म्हणजे मैत्री. ती कोणाशीही अन् कधीही होऊ शकते. अशीच घट्ट मैत्री आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत आणि अमृता खानविलकर यांच्यामधील आहे.

ये दोस्ती... हम नही छोडेंगे
दोन व्यक्तींच्या नात्यातील प्रेमाचे बंध म्हणजे मैत्री. ती कोणाशीही अन् कधीही होऊ शकते. अशीच घट्ट मैत्री आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत आणि अमृता खानविलकर यांच्यामधील आहे. पूजाने ‘सीएनक्स’सोबत त्यांच्या मैत्रीचे धागे हळुवारपणे उलगडले अन् अमृताविषयी ती भरभरून बोलली. ‘सतरंगी रे’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघींच्या मैत्रीचे सूर जुळले. त्यानंतर दोघींनी ‘झक्कास’ या सिनेमातदेखील काम केले. पूजा सांगते, माझी आई आणि अमृताची आई या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. ‘झक्कास’चे शूटिंग जेव्हा गोव्यात सुरू होते, त्या वेळी आम्ही आमच्या आईला गाडी करून द्यायचो अन् सांगायचो, ‘तुम्ही दोघी फिरून या, अमृताची काळजी घ्यायला मी आहे.’ तेव्हापासून मी तिची लहान मुलीप्रमाणे काळजी घेते.’ अमृतासोबत माझी मैत्री अधिक घट्ट होण्याचे कारण म्हणजे ती अतिशय जेन्युअन पर्सन आहे. नेहमी मला माझ्या कामासाठी बूस्ट करते, अॅप्रिशिएट करते. आम्ही दोघी एकाच इंडस्ट्रीत काम करीत असलो, तरी ती कधीच कॉम्पिटीटर म्हणून पाहत नाही किंवा तिच्यात जेलेसी ही गोष्टच नाही. ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’, असेच या दोघी म्हणत असतील. या दोघींची ही मैत्री अशीच बहरत राहू दे.