अरबाज खानच्या आयुष्यात परदेशी महिला....

By Admin | Updated: June 17, 2016 16:45 IST2016-06-17T16:25:24+5:302016-06-17T16:45:29+5:30

गेल्या काही दिवसांपासून अरबाज खान आणि 'छैंया छैंया' गर्ल मलायका अरोरा यांच्या घटस्फोटासंदर्भात सुरू असणारी चर्चा अखेर खरी ठरण्याची शक्यता आहे.

Foreign women in Arbaaz Khan's life .... | अरबाज खानच्या आयुष्यात परदेशी महिला....

अरबाज खानच्या आयुष्यात परदेशी महिला....

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ : गेल्या काही दिवसांपासून अरबाज खान आणि 'छैंया छैंया' गर्ल मलायका अरोरा यांच्या घटस्फोटासंदर्भात सुरू असणारी चर्चा अखेर खरी ठरण्याची शक्यता आहे. दोघामध्ये वेघळे होण्याचे कारण अद्याप तरी समजले नसले तरी टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार काल अभिनेता अरबाज खानला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी महिलेबरोबर होता.
 
ती परदेशी महिला कोण होती ते गुलदस्त्यातच आहे. अरबाज-मलाइका यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामगील मुख्य कारण अर्जुन कपूर आहे की ही परदेशी महिला याबाबत सध्या काही बोलण्यात तथ्य नाही. 
 
गेल्या काही दिवसांपुर्वी सलमान खानने अरबाज आणि मलायकामधील दुरावा कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न अपुरेच ठरले असल्याचे समजते आहे. 
 
(फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया)
 
मागील काही महिन्यांपासून मलायका अरबाजपासून वेगळी राहत आहे. ती खारमधील भाड्याच्या घरात मुलगा अरहानसोबत राहत आहे. त्याच अपार्टमेंटमध्ये मलायकाची बहीण अमृता राहते; मात्र मलायका तिच्याकडे राहत नाही. अमृताने वाढदिवसानिमित्त दुबईत दिलेल्या पार्टीलाही मलायका गेली नव्हती. या पार्टीला अरबाज उपस्थित होता.
 

आता मलायका-अरबाज खान होणार वेगळे?

                              

 

५ वर्ष एकमेंकाच्या प्रेमात अखंड बुडाल्यानंतर १२ डिसेंबर १९९८ रोजी मलायका व अरबाज लग्नाच्या बंधनात अडकले होते. १८ वर्षांमध्ये त्या दोघांमध्ये खटके उडाल्याचे ऐकिवात नव्हते. अलीकडे ते दोघे पॉवर कपल या रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन करत होते; मात्र जेमतेम तीन भागच ते एकत्र होते. शोसाठी येताना दोघेही वेगवेगळ्या गाडीतून येत असत. त्या वेळी या दोघांमध्ये खटके उडाल्याची चर्चा होती. 

 

Web Title: Foreign women in Arbaaz Khan's life ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.