दिल्ली-मुंबईवर चित्रपटांचा फोकस

By Admin | Published: March 2, 2016 01:30 AM2016-03-02T01:30:21+5:302016-03-02T01:30:21+5:30

दिल्लीच्या नावे बनलेल्या चित्रपटांवर नजर टाकली तर पहिले नाव राकेश ओमप्रकाश मेहराच्या ‘दिल्ली ६’ या चित्रपटाचे येते. ज्यात अभिषेक बच्चन आणि सोनम कपूरची प्रमुख भूमिका होती

Focus of Movies on Delhi-Mumbai | दिल्ली-मुंबईवर चित्रपटांचा फोकस

दिल्ली-मुंबईवर चित्रपटांचा फोकस

googlenewsNext

- anuj.alankar@lokmat.com
दिल्लीच्या नावे बनलेल्या चित्रपटांवर नजर टाकली तर पहिले नाव राकेश ओमप्रकाश मेहराच्या ‘दिल्ली ६’ या चित्रपटाचे येते. ज्यात अभिषेक बच्चन आणि सोनम कपूरची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाने खूप चांगले यश मिळविले होते. लारा दत्ताने निर्माती म्हणून ‘चलो दिल्ली’ या चित्रपटापासून सुरुवात केली. आमिर खानने आपला भाचा इमरान खान साठी ‘डैली बैली’ हा चित्रपट बनविला, दिल्लीच्या नावाने बनलेल्या चित्रपटांच्या यादीत किशोर कुमारचा चित्रपट ‘दिल्ली का ठग’ देखील आहे.
१९५८ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे गाणे आतादेखील लोकप्रिय आहेत. किशोर कुमार सोबत १९६५ मध्ये ‘न्यू डॅली’ नावाचा चित्रपट बनला होता, ज्यात त्यांची जोडी वैजयंती मालासोबत होती. १९८८ मध्ये जीतेंद्र सोबत याच शीर्षकाचा अजून एक चित्रपट बनला होता, जो एका पत्रकाराच्या जीवनावर आधारित होता. ‘अब दिल्ली दूर नहीं’, ‘दिल्ली सफारी’, ‘दिल्ली हाईट्स’ आदी चित्रपटदेखील याच यादीत येतात. मुंबई आणि बॉम्बेबाबत सांगायचे झाले तर दोन डझन नावांची यादी तयार होते. यात पहिले नाव मणिरत्नमच्या चित्रपटाचे आहे, जो मुंबईच्या सांप्रदायिक दंगलींवर आधारित होता.
१९९५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट खूपच वादात राहिला. १९५७ मध्ये बनलेला ‘मिस बॉम्बे’ हा महानगराच्या नावाचा पहिला चित्रपट मानला जातो. देव आनंदचा ‘बॉम्बे का बाबू’(१९६०) सुपर हिट राहिला होता. १९६२ मध्ये ‘बॉम्बे का चोर’चा नायक किशोर कुमार होता. १९८८ मध्ये मीरा नायरला ‘सलाम बॉम्बे’ साठी आॅस्करवारी घडली होती. एकता कपूरने ‘वंस अपॉन ए टाइम इन मुंबई’ बनविला, तर त्याच्या सिक्वलमध्ये अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हाला घेतले. पहला चित्रपट सुपर हिट राहिला, तर सिक्वल अपयशी ठरला. ‘बॉम्बे वेलवेट’द्वारे अनुराग कश्यपने करण जौहरला विलेन नक्की बनविले. पण, चित्रपट काही चालला नाही.

Web Title: Focus of Movies on Delhi-Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.