‘इफ्फी’त यंदा मराठीचा झेंडा
By Admin | Updated: November 3, 2014 01:49 IST2014-11-03T01:49:39+5:302014-11-03T01:49:39+5:30
यंदाच्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडिया’मध्ये मराठीतील १० कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे सध्या मराठी फिल्म इंडस्ट्री जाम खूश आहे.

‘इफ्फी’त यंदा मराठीचा झेंडा
यंदाच्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडिया’मध्ये मराठीतील १० कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे सध्या मराठी फिल्म इंडस्ट्री जाम खूश आहे. गोवा येथे येत्या २० ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते होणार आहे. परेश मोकाशी यांच्या 'ऐलिझाबेथ एकादशी' या सिनेमाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. 'इंडियन पॅनोरमा' विभागात प्रादेशिक भाषांमधील उत्कृष्ट चित्रपटांमध्ये परीक्षकांनी निवड केलेल्या फिचर फिल्म विभागात ७ मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. तर नॉन फिचर फिल्म विभागात मराठीतील ३ चित्रपटांची निवड झाली आहे. यात एक हजाराची नोट, डॉ. प्रकाश बाबा आमटे: द रिअल हिरो, यलो, लोकमान्य एक युगपुरुष, ऐलिझाबेथ एकादशी, किल्ला, अ रेनी डे, मित्रा, एक होता काऊ आणि प्रसन्ना विठ्या या मराठी सिनेमांचा समावेश आहे.