इम्तियाज अलीच्या "जब हॅरी मेट सेजल" सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज
By Admin | Updated: June 9, 2017 08:53 IST2017-06-09T08:51:55+5:302017-06-09T08:53:49+5:30
बॉलिवूडचा "बादशाह" शाहरूख खान आणि "फिल्लौरी गर्ल" अनुष्का शर्मा यांचा आगामी सिनेमा ""जब हॅरी मेट सेजल""चं पहिलंवहिलं पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

इम्तियाज अलीच्या "जब हॅरी मेट सेजल" सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - बॉलिवूडचा "बादशाह" शाहरूख खान आणि "फिल्लौरी गर्ल" अनुष्का शर्मा यांचा आगामी सिनेमा ""जब हॅरी मेट सेजल""चं पहिलंवहिलं पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमाचं पोस्टर शाहरूख आणि अनुष्कानं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे.
शाहरूख आणि अनुष्काच्या या सिनेमाच्या नावावरुन बराच वेळ चर्चा सुरू आली. मात्र सिनेमाचं नाव काही केल्या निश्चित होत नव्हते. सुरुवातीला या सिनेमाचं नाव ""द रिंग"" असल्याची चर्चा होती, त्यानंतर ""रहनुमा"" असेल अशी माहिती समोर आली. पण अखेर ""जब हॅरी मेट सेजल"" असे सिनेमाचं नाव निश्चित करण्यात आले आहे.
इम्तियाज दिग्दर्शित या सिनेमात शाहरूख खान आणि अनुष्का शर्माची मुख्य भूमिका आहे. शाहरूखसोबत अनुष्काचा हा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी अनुष्कानं शाहरूखसोबत ""रब ने बना दी जोडी"" या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती तर त्यानंतर ""जब तक है जान"" या सिनेमात शाहरूख-अनुष्काने पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीन शेअर करताना दिसले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमातही शाहरूख-अनुष्का एकत्र दिसणार आहेत.
दरम्यान, ""जब हॅरी मेट सेजल"" या सिनेमाबाबत सांगताना शाहरूख म्हणाला होता की, या सिनेमासाठी अनेक नावांचे पर्याय आहेत, मात्र सिनेमाची टीम अद्याप नाव निश्चित करू शकलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ""रहनुमा"" हे नाव शाहरूखला खूप आवडले होते, याशिवाय ""रौला"" या नावावरही बरीच चर्चा करण्यात आली, मात्र या नावांना सर्वांनी सहमती दर्शवली नाही. कारण सिनेमाचं नाव सर्वसामान्य हिंदीत असावं, असे टीमचं म्हणणं होतं. अखेर प्रचंड विचारविनिमय केल्यानंतर ""जब हॅरी मेट सेजल"" या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
""जब हॅरी मेट सेजल"" हा एक रोमाँटिक सिनेमा आहे, ज्यात दोन वेगवेगळ्या देशात राहणारे म्हणजेच हॅरी(शाहरूख) आणि सेजल (अनुष्का) यांना एकमेकांसोबत प्रेम होते. ""रईस"" सिनेमाच्या यशानंतर या सिनेमाचंही नाव आर(R) या अक्षरापासून असावं, अशी शाहरूखची इच्छा होती.
दरम्यान, सिनेमाचा ट्रेलर सलमान खानचा सिनेमा ट्युबलाइटच्या प्रदर्शनावेळी रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
What you seek... @iamsrk@RedChilliesEntpic.twitter.com/I48uQ102Su— Anushka Sharma (@AnushkaSharma) June 8, 2017
...is seeking you! @AnushkaSharma@RedChilliesEntpic.twitter.com/8L6N7d5req— Shah Rukh Khan (@iamsrk) June 8, 2017