‘झलक’च्या पहिल्या भागात हृतिक असणार पाहुणा!

By Admin | Updated: July 8, 2016 02:38 IST2016-07-08T02:38:40+5:302016-07-08T02:38:40+5:30

डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘झलक दिखला जा-9’ जुलै महिन्याच्या अखेरीस छोट्या पडद्यावर दाखल होतोय. या शोच्या पहिल्या भागात प्रमुख पाहुणा असेल तो अभिनेता हृतिक रोशन.

In the first part of 'Jhalak', Hrithik will be guests! | ‘झलक’च्या पहिल्या भागात हृतिक असणार पाहुणा!

‘झलक’च्या पहिल्या भागात हृतिक असणार पाहुणा!

डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘झलक दिखला जा-9’ जुलै महिन्याच्या अखेरीस छोट्या पडद्यावर दाखल होतोय. या शोच्या पहिल्या भागात प्रमुख पाहुणा असेल तो अभिनेता हृतिक रोशन. आगामी ‘मोहन्जोदडो’ या सिनेमाच्या प्रमोशनला हृतिक या शोमधून सुरुवात करणार आहे. मोहन्जोदडो हा सिनेमा १२ आॅगस्टला रसिकांच्या भेटीला येतोय. त्यामुळे आपल्या या सिनेमाच्या प्रमोशनला हृतिक झलकच्या सेटवर जाऊन डान्सर आणि सेलीब्रिटी जजसह डान्स करणार आहे. जुलैच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईतील फिल्मसिटीमध्ये ‘झलक’च्या या भागाचे शूटिंग होणार आहे. २०१३ साली ‘बँग बँग’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हृतिकने झलकच्या फिनालेला हजेरी लावली होती. त्या वेळी सेलीब्रिटी जज धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेनेसह हृतिक थिरकला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा डान्स फ्लोअर गाजवण्यासाठी हृतिक सज्ज झालाय.

Web Title: In the first part of 'Jhalak', Hrithik will be guests!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.