‘अॅक्शन जॅक्सन’चा फर्स्ट लूक रिलीज
By Admin | Updated: October 6, 2014 02:54 IST2014-10-06T02:54:02+5:302014-10-06T02:54:02+5:30
प्रभुदेवा दिग्दर्शित ‘अॅक्शन जॅक्सन’चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अजय देवगण अनोख्या भूमिकेत आहे

‘अॅक्शन जॅक्सन’चा फर्स्ट लूक रिलीज
प्रभुदेवा दिग्दर्शित ‘अॅक्शन जॅक्सन’चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अजय देवगण अनोख्या भूमिकेत आहे. कधी पोलीस बनून तो भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणार आहे, तर कधी कॉमेडी आणि मायकेल जॅक्सनसारखा डान्सदेखील करणार आहे. प्रभुदेवासारखा गुरू मिळाल्यास कुणीही मायकेल जॅक्सन बनू शकतो, अजय त्याला अपवाद कसा असेल. स्टायलिश जॅकेट परिधान केलेला आणि डोक्यावर हॅट असलेल्या अजयचे ‘अॅक्शन जॅक्सन’मधील रूप वेगळेच दिसत आहे. प्रभुदेवाने या चित्रपटातून जॅक्सनला श्रद्धांजली अर्पण केली आहे.