Finally अंकिता लोखंडेला लॉन्च करणार कंगना राणौत!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 16:12 IST2017-07-03T04:42:18+5:302017-07-03T16:12:12+5:30
सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा बºयाच दिवसांपासून होते आहे. पण अद्याप योग आला ...
.jpg)
Finally अंकिता लोखंडेला लॉन्च करणार कंगना राणौत!!
स शांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा बºयाच दिवसांपासून होते आहे. पण अद्याप योग आला नव्हता. पण आता कदाचित अंकिताच्या नशीबाची कवाडं खुली झाली आहेत. अंकिताच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. आता अभिनेत्री कंगना राणौतच्या चित्रपटातून अंकिताचा बॉलिवूड डेब्यू होणार आहे. होय, ‘मणिकर्णिका : दी क्विन आॅफ झांसी’ या चित्रपटात अंकिता झळकणार आहे.
यापूर्वीही अंकिताच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा आल्यात. पण त्या सगळ्या अफवा ठरल्या. आता मात्र खुद्द अंकिताने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. म्हणजेच बातमी एकदम पक्की आहे. ‘मणिकर्णिका : दी क्विन आॅफ झांसी’ या चित्रपटात अंकिता झलकारीबाईची भूमिका साकारणार आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईनेआपल्या शौर्यानेआणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाईच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यू रोजच्या सैन्याशी युद्ध केले. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. त्यांनी झलकारीबाईला पकडले व फासावर लटकवले होते. हीच भूमिका अंकिता साकारणार आहे.
![]()
ALSO READ : ‘मणिकर्णिका’नंतर कंगना राणौत करणार अॅक्टिंगला बाय-बाय!
अंकिता या भूमिकेबद्दल कमालीची उत्सूक आहे. तिने याबद्दल सांगितले की, मी यापूर्वी झलकारीबार्इंबद्दल कधीही ऐकले नव्हते. पण इतिहासात इलकारीबार्इंचे अनन्यासाधारण स्थान आहे. राणी लक्ष्मीबाईच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या झलकारीबाईचे पात्र साकारण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे. यासाठी गेल्या महिनाभरापासून मी घोडस्वारी शिकते आहे. कंगनासारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीसोबत काम करायला मिळणे, हेही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.