दिग्दर्शनात फसलेला चित्रपट

By Admin | Published: October 30, 2015 11:29 PM2015-10-30T23:29:20+5:302015-10-30T23:29:20+5:30

१९९० च्या दशकात चार्ल्स शोभराज याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगाने पुढे आले. या कुख्यात आरोपीच्या नावे लूटमार, धोकेबाजीसह वेगवेगळ्या देशांत महिलांच्या हत्या आदी गंभीर गुन्हे तर होतेच

Filmed in directed film | दिग्दर्शनात फसलेला चित्रपट

दिग्दर्शनात फसलेला चित्रपट

googlenewsNext

१९९० च्या दशकात चार्ल्स शोभराज याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगाने पुढे आले. या कुख्यात आरोपीच्या नावे लूटमार, धोकेबाजीसह वेगवेगळ्या देशांत महिलांच्या हत्या आदी गंभीर गुन्हे तर होतेच; पण १९८६ मध्ये तिहार जेलमधून त्याचे फरार होणे हे चित्रपटाच्या कथानकाला शोभणारे आहे. दिग्दर्शक प्रबाल रमन यांनी (डरना मना है फेम) मैं और चार्ल्स या चित्रपटात शोभराजच्या जीवनाचे अनेक पैलू दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटाची सुरुवात थायलंडच्या बँकॉकमधून होते. जेथे एका तरुणीचा मृतदेह पडलेला आहे. पोलिसांना शोभराजवर संशय येतो. हॉटेलमध्ये शोभराजची शिकार झालेल्या आणखी एका महिलेचा मृतदेह आढळून येतो. बँकॉक पोलीस पोहोचेपर्यंत शोभराज पळून जातो आणि थेट भारतात येतो. दिल्लीत त्याला अटक केली जाते. कायद्याचे शिक्षण घेत असलेली मीरा (रिचा चढ्ढा) त्याच्या प्रेमात पडते. मीरा आणि दुसऱ्या कैद्यांच्या मदतीने शोभराज तिहार जेलमधून फरार होण्यात यशस्वी होतो. दिल्ली पोलीसचे वरिष्ठ अधिकारी अमोद कांत (आदिल हुसैन) हे आव्हान स्वीकारतात आणि शोभराजला पुन्हा पकडण्याचा निर्धार करतात. शोभराज दिल्लीहून मुंबई आणि पुन्हा गोव्याला जातो. दिल्ली पोलिसांच्या टिपवरून मुंबई पोलीस विभागाचे अधिकारी सुधाकर (नंदू माधव) गोव्यात शोभराजला अटक करण्यात यशस्वी होतात. मात्र, शोभराजच्या अटकेवरून दिल्ली, मुंबई आणि गोव्याच्या पोलिसांत रस्सीखेच सुरू होते. दरम्यान, शोभराज कायद्याच्या पळवाटांचा फायदा उठवितो.
उणिवा - गुन्हेगारी जीवनावर आधारित कथानकाचे नेमके काय करायचे? यावर दिग्दर्शक प्रबाल हे कन्फ्यूज असल्याचे दिसते. महिलांचे शोभराजला असलेले आकर्षण आणि त्यांच्या हत्या या घटना दिग्दर्शकांनी फक्त सेक्सच्या दृष्टिकोनातून दाखविल्या आहेत. दिल्ली पोलिसांची अवस्था तर जोकरसारखी आहे. शोभराजला कधी हीरो तर कधी व्हिलन बनविणारी दिग्दर्शकाची टीम भटकताना दिसते.

Web Title: Filmed in directed film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.