मोदींचे फोटो असलेला ड्रेस घातल्याप्रकरणी राखीविरोधात गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 4, 2016 16:17 IST2016-11-04T15:42:15+5:302016-11-04T16:17:23+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेला ड्रेस परिधान केल्याने राखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोदींचे फोटो असलेला ड्रेस घातल्याप्रकरणी राखीविरोधात गुन्हा दाखल
>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. ४ - बेताल वक्तव्ये आणि वादग्रस्त वर्तनासाठी (कु) प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत हिच्याविरोधात कंक्रोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेला ड्रेस परिधान केल्याने राखीविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या दौ-यावर असताना राखीने काळ्या रंगाचा एका तोकडा ड्रेस घातला होता. त्या ड्रेसवर ठिकठिकाण पंतप्रधान नरेंद्र मोदींची छायाचित्रे छापण्यात आली होती, ज्यामुळे बराच वादही निर्माण झाला व ते फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याप्रकरणी स्थानिक वकील प्रजीत तिवारी यांनी पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. ' मोदींची छायाचित्र असलेला ड्रेस घालून राखी सावंत हिने पंतप्रधानांचा अपमान केल्याचे' या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.