बाप-बेटा सेम टू सेम
By Admin | Updated: January 3, 2015 21:55 IST2015-01-03T21:55:16+5:302015-01-03T21:55:16+5:30
बॉलीवूड बादशाहा शाहरुख खान आपल्या कामात जितका व्यग्र असतो तितकाच सुटीचा वेळ तो आपल्या कुटुंबासह घालवतो.

बाप-बेटा सेम टू सेम
बॉलीवूड बादशाहा शाहरुख खान आपल्या कामात जितका व्यग्र असतो तितकाच सुटीचा वेळ तो आपल्या कुटुंबासह घालवतो. शाहरुखने नवीन वर्षाचा पहिला दिवस त्याचा लहान मुलगा अबराम याच्यासोबत घालावला. शाहरुखची मुलं त्याचा पावलावर पाऊल ठेवतात का, ते तर येत्या
काही वर्षांत कळेलच. मात्र त्याची स्टाईल अबराममध्ये आतापासूनच पाहायला मिळत आहे. इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी शाहरुख आणि अबरामसोबतचे त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले. या छायाचित्रात शाहरुख आणि अबरामची एकसारखी हेअरस्टाइल दिसत आहे.