फरहान अख्तरचा पहिला चित्रपट नऊ वर्षांनंतर होणार रिलीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2017 18:56 IST2017-02-12T18:56:03+5:302017-02-12T18:56:03+5:30
रॉक ऑन हा जरी फरहानचा पहिला चित्रपट मानला जात असला तरी त्याने या चित्रपटापूर्वी द फकिर ऑफ वेनिस हा चित्रपट साईन केला होता

फरहान अख्तरचा पहिला चित्रपट नऊ वर्षांनंतर होणार रिलीज
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - रॉक ऑन हा जरी फरहानचा पहिला चित्रपट मानला जात असला तरी त्याने या चित्रपटापूर्वी द फकिर ऑफ वेनिस हा चित्रपट साईन केला होता, मात्र रॉक ऑन आधी प्रदर्शित झाल्याने तो पहिला चित्रपट मानला जातो. काही कारणास्तव द फकिर ऑफ वेनिस चित्रपट रखडला गेला होता. मात्र आता चित्रपट प्रदर्शनाला मुहूर्त मिळाला आहे. द फकिर ऑफ वेनिसवरील सर्व संकटे टळली असून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या १० मार्च रोजी द फकिर ऑफ वेनिस प्रदर्शित केला जाणार आहे.
द फकिर ऑफ वेनिस हा चित्रपट दिग्दर्शक होमी अदजानिया यांच्यावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. यात फरहान अख्यर साकारत असलेली भूमिका होमीची असेल असे सांगण्यात येते. या चित्रपटात फरहान अख्तरसोबत कमल सिद्धू, इटालीयन अभिनेत्री वेलेंटिना आणि जर्मन अभिनेता मॅथ्यू कॅरेरे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद सुरापूर व निर्मिती पुनित देसाई यांनी केली आहे.
फरहानने रॉक ऑन, लक बाय चान्स, शादी के साईड इफेक्टस्, कार्तिक कॉलिंग कार्तिक, भाग मिल्खा भाग, जिंदगी ना मिलेगी दोबारा, वजीर असे एकाहून एक सरस चित्रपट केले आहेत. या सर्व चित्रपटातून त्याच्या अभिनयाची प्रशंसा झाली आहे.