नवीन चित्रपटांच्या पदरी अपयश

By Admin | Updated: May 31, 2016 03:21 IST2016-05-31T03:21:00+5:302016-05-31T03:21:00+5:30

मागच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्यांपैकी एकही चित्रपट बिग बजेटचा किंवा बड्या कलाकाराचा नसल्याने कोणालाही फारशी अपेक्षा नव्हती. तिकीटबारीवर या चित्रपटांचा पहिला आठवडाअखेर निराशाजनक राहिला

Failure of new movies | नवीन चित्रपटांच्या पदरी अपयश

नवीन चित्रपटांच्या पदरी अपयश

मागच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्यांपैकी एकही चित्रपट बिग बजेटचा किंवा बड्या कलाकाराचा नसल्याने कोणालाही फारशी अपेक्षा नव्हती. तिकीटबारीवर या चित्रपटांचा पहिला आठवडाअखेर निराशाजनक राहिला. रामगोपाल वर्मा यांच्या ‘वीरप्पन’सह पवन कृपलानी यांचा रोमांचक ‘फोबिया’ आणि नसीर काल्की यांचा ‘वेटिंग’ यापैकी एकाही चित्रपटाच्या पदरात मोठे यश पडले नाही. कमाईचे आकडे पाहिले तर रामगोपाल यांच्या ‘वीरप्पन’ने पहिल्या तीन दिवसांत ४ कोटींपेक्षा जादा कमाई केली. दीड कोटीच्या कमाईने ‘फोबिया’ दुसऱ्या क्रमांकावर
राहिला, तर ‘वेटिंग’ने १ कोटी २० लाखांची कमाई केली. ‘फ्रेड्रीक’ पहिल्याच दिवशी आपटला.
त्याआधी प्रदर्शित झालेल्या ‘सरबजीत’ची कमाई पहिल्या तीन दिवसांत ११ कोटी होती.
त्यानंतर दहा दिवसांत कमाईचा आकडा १९ कोटींवर गेला. कमाईच्या दृष्टीने हा चित्रपटही अपयशी ठरला. ‘अजहर’चीही अशीच गत झाली. माजी क्रिकेटपटू अझरुद्दीनच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात ३१ कोटी कमावले. डीयर डॅड आणि
विवेक अग्निहोत्रीचा ‘बुद्धा इन ट्रॅफिक जाम’ या चित्रपटालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. येत्या शुक्रवारी साजिद नाडियादवाला
यांचा ‘हाऊसफुल-३’ प्रदर्शित होत असून यात अक्षय कुमार आणि रितेश
देशमुख यांच्यासोबत अभिषेक बच्चन आहे. या वेळी दिग्दर्शक बदलण्यात आला आहे. हा चित्रपट
प्रेक्षकांना किती भावतो, हे यथावकाश कळेलच.

Web Title: Failure of new movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.