फवाद खान पुन्हा झाला 'बाबा', घरी आली नन्ही परी

By Admin | Updated: October 5, 2016 11:25 IST2016-10-05T10:20:09+5:302016-10-05T11:25:41+5:30

पाकिस्तानी कलाकार फवाद खान पुन्हा एकदा बाबा झाला आहे. फवाद खानच्या घरी नन्ही परी दाखल झाली आहे.

Fad Khan again came back 'Baba', who came home at the tiny fairy | फवाद खान पुन्हा झाला 'बाबा', घरी आली नन्ही परी

फवाद खान पुन्हा झाला 'बाबा', घरी आली नन्ही परी

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 5 - पाकिस्तानी कलाकार फवाद खान पुन्हा एकदा बाबा झाला आहे. फवाद खानच्या घरी नन्ही परी दाखल झाली आहे. मंगळवारी फवाद खानची पत्नी सदाफने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. फवाद खान काही दिवसांपासून पत्नी सदाफसोबत पाकिस्तानात आहे. करण जोहरचा सिनेमा 'ए दिल है मुश्किल'मध्ये फवाद दिसणार आहे. या सिनेमाच्या शुटिंगनिमित्त तो भारतात होता. यानंतर पत्नीच्या बाळंतपणासाठी तो पाकिस्तानात परतला. फवाद खानने 2005 मध्ये प्रेयसी सदाफसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अयान असून तो 6 वर्षांचा आहे. 
 
आणखी बातम्या 
दरम्यान,  पाकिस्तानी कलाकार फवाद खानने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा आगामी सिनेमा 'ए दिल है मुश्लिक'मध्ये तो दिसणार आहे. या सिनेमामध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या ही स्टारकास्ट देखील आहे. मात्र उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यासाठी बंदी घालण्यात आल्यामुळे फवाद सिनेमाचे प्रमोशन करताना दिसणार नसल्याची माहिती आहे. 
 

 

Web Title: Fad Khan again came back 'Baba', who came home at the tiny fairy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.