मित्रपरिवारासह लुटा चित्रपटाचा आनंद

By Admin | Updated: July 18, 2015 04:42 IST2015-07-18T04:42:10+5:302015-07-18T04:42:10+5:30

कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ (बीबी) चित्रपटरसिकांच्या उदंड उत्सुकतेनंतर प्रदर्शित झाला. सलमान भाई यात कसा दिसणार, पवन कुमार खरंच त्या मुलीला तिच्या वडिलांशी

Enjoy the movie with friends | मित्रपरिवारासह लुटा चित्रपटाचा आनंद

मित्रपरिवारासह लुटा चित्रपटाचा आनंद

कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ (बीबी) चित्रपटरसिकांच्या उदंड उत्सुकतेनंतर प्रदर्शित झाला. सलमान भाई यात कसा दिसणार, पवन कुमार खरंच त्या मुलीला तिच्या वडिलांशी कसा भेटवणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातून सलमान त्याच्या चाहते व मित्रांना संदेश देऊ इच्छितो. तो म्हणतो, की तुमचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यासोबत चित्रपटाचा आनंद लुटा. करिना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दिकी हे दोघेही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत. करिना कपूर म्हणते, की सलमान आणि मी खूप दिवसांनंतर सोबत काम केलं आहे. मला वाटतं की आमची केमिस्ट्री फारच सुंदर होती. मी खरंतर सलमानची खूप मोठी चाहती आहे. त्यामुळे प्रयत्न करीत आहे, की प्रेक्षकांसोबत फर्स्ट शो पाहावा. ‘बजरंगी भाईजान’ची कथा म्हणजे ही खरंतर तुमच्या आत्म्याची आहे़ तुम्ही जेव्हा पवनला पाहाल तेव्हा तुम्ही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. पवनच्या मित्राची भूमिका करणारा नवाज म्हणतो, की सध्याच्या जीवनात ‘बजरंगी’सारखा चित्रपट पाहणं अत्यंत आवश्यक आहे. दोन मनं, दोन धर्म, दोन देश यांच्या मिलनानं निर्माण होणारी सकारात्मकता देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. मला वाटतं की एवढा व्यापक संदेश देणारा दुसरा तरी कुठला चित्रपट सध्या नाही.

Web Title: Enjoy the movie with friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.