सेलीब्रिटींवर ‘इमोशनल’ अत्याचार

By Admin | Updated: September 10, 2015 04:36 IST2015-09-10T04:36:28+5:302015-09-10T04:36:28+5:30

बॉलीवूडमधील कलाकारांच्या लग्नाच्या किंवा घटस्फोटाच्या अफवा उडणे ही आता नित्याची बाब बनली आहे. यात मीडियाचा मोठा हातभार लागत असतो. जेव्हा माध्यमे याबाबतीत बोलायला

'Emotional' atrocities on celebrities | सेलीब्रिटींवर ‘इमोशनल’ अत्याचार

सेलीब्रिटींवर ‘इमोशनल’ अत्याचार

बॉलीवूडमधील कलाकारांच्या लग्नाच्या किंवा घटस्फोटाच्या अफवा उडणे ही आता नित्याची बाब बनली आहे. यात मीडियाचा मोठा हातभार लागत असतो. जेव्हा माध्यमे याबाबतीत बोलायला सुरुवात करतात तेव्हा संबंधित कलाकाराने काहीही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरी कमी-अधिक प्रमाणात त्याचे नुकसान झालेलेच असते.

जॉन - प्रिया
जॉन अब्राहमला त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि त्यासंबंधातील अफवांबाबत एका मुलाखतीत विचारण्यात आले, तेव्हा त्याने स्पष्ट केले की, मी स्वर्गात खूश आहे. स्वर्गात काय आनंदीआनंद असतो. पण अफवा खऱ्या नाहीयेत. या सर्व बकवास गोष्टी आहेत. जेव्हा लोक अशा गोष्टी सांगतात तेव्हा खूप वाईट वाटते. खरेच मी खूप आनंदी आहे.’ जेव्हा एखादा कलाकार आपल्या जोडीदारापासून वेगळं राहत असेल, सार्वजनिक समारंभात भांडत असेल, तेव्हा अशा वावड्या अधिक उठतात. अनेक कलाकार सत्य बोलण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र काही वेळा ते पुढे येऊन बोलतात आणि अफवांबाबत स्पष्टीकरण देतात.

अर्जुन रामपाल - मेहेर
अर्जुन रामपाल यालादेखील आपल्या पत्नीबाबत होत असलेल्या नकारात्मक अफवांचा फटका बसला. सुरुवातीला त्याने काही सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने या अफवांबाबत बोलणे सोडून दिले. अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहेरच्या घटस्फोटाबाबत अनेक माध्यमांमधून चर्चा झाली. काही महिन्यांपूर्वी हृतिक रोशन आणि सुझान खान रोशन यांनी घटस्फोट घेतला. या दोघांचे संबंध अगदी घट्ट होते. आपण यावर कोणतेही भाष्य करणार नसल्याचे हृतिकने म्हटले. अर्जुनने मेहेरसोबत १५ वर्षांपूर्वी लग्न केले. मागे त्याने एकदा माध्यमांना फटकारले होते, मात्र याचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. ‘मला काहीही सांगायचे नाही. मला वाटते माझ्यापेक्षा अधिक या लोकांना माहिती आहे’, अशा शब्दांत अर्जुनने या अफवांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. माध्यमे बऱ्याच वेळा खूप अधिक बोलतात. यापूर्वी सुझान आणि हृतिकमध्ये मतभेद असल्याचे माध्यमांनी सांगितले होते.

शाहरूख - गौरी
शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी यांच्यातही मतभेद असल्याचे सांगण्यात आले होते आणि या मतभेदाचे कारण प्रियंका चोप्रा असल्याचीही अफवा पसरविण्यात आली होती. गौरी प्रियंकाचा प्रचंड राग करते. शाहरूखसोबत प्रियंकाची जवळीक गौरीला पसंत नाही. म्हणूनच त्यांच्यात रोज वाद होत असतात, असेही काहींनी ठोकून दिले होते. परंतु या अफवांचा या दोघांवरही काहीच परिणाम झाला नाही. याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी आपले हळवे नाते अतिशय विश्वासाने जपले.

- meha.sharma@lokmat.com

 

Web Title: 'Emotional' atrocities on celebrities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.