अर्जुन-मेहेरमध्ये दुरावा
By Admin | Updated: March 11, 2015 22:58 IST2015-03-11T22:58:03+5:302015-03-11T22:58:03+5:30
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या घटस्फोटाला काही दिवस उलटत नाहीत तोच आता अभिनेता अर्जुन रामपाल आणि प्रसिद्ध मॉडेल मेहर

अर्जुन-मेहेरमध्ये दुरावा
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या घटस्फोटाला काही दिवस उलटत नाहीत तोच आता अभिनेता अर्जुन रामपाल आणि प्रसिद्ध मॉडेल मेहर जेसिया हेसुद्धा विभक्त होणार असल्याची चर्चा रंगतेय. प्रीती झिंटाच्या बर्थ डे पार्टीत मेहर एकटीच आल्याने या दोघांमध्ये काही आलबेल नसल्याचे सर्वांच्याच लक्षात आले. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला असून त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तारीखदेखील ठरली आहे.