प्रीतीमुळे प्रेक्षकाला चित्रपटगृहाबाहेर काढले
By Admin | Updated: October 9, 2014 23:50 IST2014-10-09T23:50:20+5:302014-10-09T23:50:20+5:30
प्रीती झिंटाचे नाव चित्रपटांमुळे कमी, तर चुकीच्या कारणांमुळे जास्त चर्चेत असते. नुकतेच तिचे नाव अशा एका प्रकरणात आले आहे,

प्रीतीमुळे प्रेक्षकाला चित्रपटगृहाबाहेर काढले
प्रीती झिंटाचे नाव चित्रपटांमुळे कमी, तर चुकीच्या कारणांमुळे जास्त चर्चेत असते. नुकतेच तिचे नाव अशा एका प्रकरणात आले आहे, ज्यात एका प्रेक्षकाला चित्रपटगृहातून बाहेर काढण्यात आले. प्रीती मुंबईच्या एका चित्रपटगृहात ‘बँगबँग’ पाहायला गेली होती. चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू झाले. चित्रपटगृहात उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती उभी झाली, पण एक व्यक्ती उभी राहिली नाही, त्यामुळे प्रीतीला राग आला. प्रीतीने धक्का देत त्या प्रेक्षकाला चित्रपटगृहाबाहेर काढल्याचे सांगितले जात आहे; पण प्रीतीने हे खरे नसल्याचे म्हटले आहे. ती म्हणते, माझ्याप्रमाणे इतरांनाही या गोष्टीचा राग आला आणि त्यांनीच याचा विरोध करीत त्या व्यक्तीला बाहेर जायला सांगितले.