स्वप्निलला करायचाय फीमेल रोल

By Admin | Updated: March 13, 2016 02:08 IST2016-03-13T02:08:48+5:302016-03-13T02:08:48+5:30

सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुबोध भावे, अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर श्रोत्री अशा बऱ्याच कलाकारांनी मोठ्या पडद्यावर स्त्री-भूमिका रंगविल्या आहेत

Dream girl fame roll | स्वप्निलला करायचाय फीमेल रोल

स्वप्निलला करायचाय फीमेल रोल

सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुबोध भावे, अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर श्रोत्री अशा बऱ्याच कलाकारांनी मोठ्या पडद्यावर स्त्री-भूमिका रंगविल्या आहेत. साडीमध्ये मेक-अप करून तो रोलसाठी कॅरी करणे आणि सतत स्त्रीवेषात राहणे हे खरंच चॅलेंजिग काम. अशीच स्त्रीव्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्याची इच्छा आपला हॅण्डसम हंक स्वप्निल जोशी याला झाली आहे. ‘सीएनएक्स’सोबत केलेल्या खास बातचीतमध्ये स्वप्निल म्हणतोय, मला फिमेल कॅरॅक्टर करायला नक्कीच आवडेल; पण त्यासाठी स्ट्राँग स्क्रीप्ट हवी. उगाचच गिमिक म्हणून असा रोल करायला मला नाही आवडणार. खऱ्याच्या जवळ जाणारी अन् प्रेक्षकांना अपील होणारी स्त्री मोठ्या पडद्यावर साकारायला मला नक्कीच आवडेल. सचिन पिळगावकर यांनी ‘बनवा बनवी’मध्ये जे स्त्रीपात्र साकारले आहे, तसे स्त्रीपात्र मी पुन्हा पाहिले नाही. स्वप्निलची ही इच्छा लवकरच पूर्ण होवो आणि त्याला पडद्यावर दमदार स्त्री-भूमिका करायला मिळो यासाठी ‘सीएनएक्स’ टीमकडून त्याला खुप शुभेच्छा.

Web Title: Dream girl fame roll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.