हृतिकबरोबर डान्स करण्याचे संस्कृतीचे स्वप्न
By Admin | Updated: December 23, 2015 00:22 IST2015-12-23T00:22:13+5:302015-12-23T00:22:13+5:30
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुणाला तरी आपण आयडॉल मानलेले असते, त्या व्यक्तीची भेट घडणे किंवा तिच्याशी बोलायला मिळणे हे आपले स्वप्न असते.

हृतिकबरोबर डान्स करण्याचे संस्कृतीचे स्वप्न
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुणाला तरी आपण आयडॉल मानलेले असते, त्या व्यक्तीची भेट घडणे किंवा तिच्याशी बोलायला मिळणे हे आपले स्वप्न असते. मग ती व्यक्ती एखादी कलाकार का असेना! असंच एक स्वप्न उराशी बाळगून आहे मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे. म्हणे बॉलिवूडचा मँचो मॅन हृतिक रोशन सोबत डान्स करण्याचे तिचे स्वप्न आहे. पुण्यात लहानाची मोठी झालेली संस्कृती खूपच छान डान्सर आहे. वयाच्या सातव्या वर्षीपासूनच ती स्टेज परफॉर्मंस करते. मात्र, तिला हृतिक रोशनचा डान्स खूप जास्त आवडतो. एक दिवस हृतिक सोबत डान्स करायला मिळावा, अशी तिची मनापासूनची इच्छा आहे. संस्कृती सांगते की तिचा आणि हृतिकच्या वाढदिवसाच्या तारखेचा पहिला अंक सारखाच म्हणजे 1 हा आहे. ऋतिकचा 10 तारखेला असतो आणि माझा 19 डिसेंबरला. आता बघूया हृतिकसोबत काम करण्याचं तिचं स्वप्न कधी पूर्ण होत ते!