'रेशमाच्या रेघांनी...' गाण्यातली अभिनेत्री आठवतेय का? आता त्यांना ओळखणं झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:06 IST2025-07-01T18:05:59+5:302025-07-01T18:06:30+5:30
'रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी', 'अखेरचा हा तुला दंडवत', 'हसता हुआ नुरानी चेहरा'...या आणि अशा कितीतरी गाण्यातून ज्येष्ठ अभिनेत्री जीवनकला कांबळे-केळकर यांनी रसिकांच्या मनात आपले स्थान बनवले आहे. आता त्या ८१ वर्षांच्या असून कलाविश्वापासून दूर आहेत.

'रेशमाच्या रेघांनी...' गाण्यातली अभिनेत्री आठवतेय का? आता त्यांना ओळखणं झालंय कठीण
'रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी', 'अखेरचा हा तुला दंडवत', 'हसता हुआ नुरानी चेहरा'...या आणि अशा कितीतरी गाण्यातून ज्येष्ठ अभिनेत्री जीवनकला कांबळे-केळकर यांनी रसिकांच्या मनात आपले स्थान बनवले आहे. आता त्या ८१ वर्षांच्या असून कलाविश्वापासून दूर आहेत. भलेही त्या सिनेइंडस्ट्रीत फारश्या सक्रीय नसल्या तरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
८१ वर्षीय जीवनकला कांबळे-केळकर सोशल मीडियावर सक्रीय असून ते व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या त्यांचा एक क्युट व्हिडीओ व्हायरल होत आहे. ८१व्या वर्षीदेखील अभिनेत्री फिट दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दिली आहे.
जीवनकला केळकर यांनी अखेर जमलं या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्यांना नृत्य सादर करण्याच्या संधी मिळत गेल्या. गुंज उठी शहनाई या गाजलेल्या हिंदी चित्रपटात त्यांना अंखीयां भूल गई… हे गाणं सादर केले. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या करिअरला कलाटणी मिळेल. जीवनकला यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. सरस्वतीचंद्र, किस्मत पलट के देख, पारसमणी या हिंदी चित्रपटात त्या झळकल्या. पुत्र व्हावा ऐसा, चिमण्यांची शाळा, हा माझा मार्ग एकला, वैशाख वणवा, शेरास सव्वाशेर, मराठा तितुका मेळवावा, काळी बायको या मराठी सिनेमातही त्यांनी काम केले.
काही वर्षांपूर्वी जीवनकला डान्स दिवाने या शोमध्ये झळकल्या होत्या. तब्बल ४७ वर्षांनी त्या कॅमेरासमोर आल्या होत्या. हे पाहून चाहत्यांनाही विश्वास बसला नव्हता. जीवनकला यांची लेक मनीषा केळकर देखील अभिनेत्री आहे. जीवनकला या निवृत्तीनंतर सध्या परदेशात आनंदी आयुष्य जगत आहेत.