"पुकी बाबा" अनिरुद्धाचार्य यांचं महिलांबद्दल अपमानास्पद विधान, दिशा पाटनीच्या बहिणीनं घेतला समाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:58 IST2025-07-30T11:58:11+5:302025-07-30T11:58:35+5:30
"पुकी बाबा" अनिरुद्धाचार्य महाराज झाले टीकेचे धनी, महिलांबद्दल काय म्हणाले?

"पुकी बाबा" अनिरुद्धाचार्य यांचं महिलांबद्दल अपमानास्पद विधान, दिशा पाटनीच्या बहिणीनं घेतला समाचार
Khushboo Patani On Aniruddhacharya Maharaj: "पुकी बाबा" या नावाने ओळखले जाणारे अनिरुद्धाचार्य महाराज नेटकऱ्यांना प्रिय आहेत. त्यांची मिश्किल शैली अनेकांना भावते तर अनेकांसाठी ती टीकेचा विषय बनते. अलिकडेच अनिरुद्धाचार्य महाराज यांनी मुलींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर दिशा पटानीची बहीण आणि माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानीने संताप व्यक्त केलाय.
अनिरुद्धाचार्य महाराजांनी लिव्ह-इन रिलेशनशिपवर भाष्य महिलांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. ते म्हणाले होते, "जेव्हा २५ वर्षांची मुलगी येते, तेव्हा ती पूर्ण प्रौढ असते. सर्वच नाही, तर अनेकांनी आधीच कोणाशी तरी ४-५ ठिकाणी संबंध ठेवले असतात". अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या या वक्तव्यावर खुशबूने व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. खुशबू व्हिडीओमध्ये म्हणाली, "मी त्या भाषणात असती तर, त्यांना विचारलं असतं, तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे".
पुढे तिनं म्हटलं, अनिरुद्धाचार्य राष्ट्रविरोधी आहेतजर लिव्ह इन रिलेशनशिपची समस्या आहे, तर ते मुलांवर का प्रश्न उपस्थित करत नाही. जे लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये राहण्याची निवड करतात. त्यांनी फक्त मुलींवर प्रश्न का उपस्थित केला", असा प्रश्न खुशबूने केला. तसेच तिनं महिलांचा अपमान करणाऱ्या अशा कथनकर्त्यांना पाठिंबा देऊ नका अशी विनंती लोकांना केली.
जो बाबा लड़कियों को सिर्फ शरीर समझे, वो संत नहीं, सीधा जेल के लायक है।
— Anand Yadav (Sonu) (@yadavsonuanand) July 29, 2025
अनिरुद्धाचार्य जैसे बाबा का बहिष्कार होना चाहिए।
खुशबू पटानी ने सच दिखाया अब बोलो भक्तों, क्या यही है तुम्हारा धर्म? 😡🔥 pic.twitter.com/i2OuxiBhku