लग्नाची चर्चा बिनबुडाची
By Admin | Updated: November 30, 2015 02:37 IST2015-11-30T02:37:43+5:302015-11-30T02:37:43+5:30
मा गील वर्षी प्रीती झिंटाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वाईट वागणुकीबद्दल तक्रार दिली होती. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आहे. काही दिवसांपासून प्रीतीचे लवकरच

लग्नाची चर्चा बिनबुडाची
मा गील वर्षी प्रीती झिंटाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वाईट वागणुकीबद्दल तक्रार दिली होती. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आहे. काही दिवसांपासून प्रीतीचे लवकरच लग्न होणार असल्याच्या बातम्या आहेत. मात्र, तिने याविषयीचे मौन तोडले आहे. तिने सांगितले आहे की, ती सध्या लग्न करणार नाही आणि केले तरी ती अगोदरच सांगेल. ती पुढील वर्षी जानेवारीत विदेशी बॉयफ्रेंड जेने गुडेनफ याच्यासोबत लग्न करण्यासाठी अमेरिकेत जाणार असल्याचे कळले आहे. मात्र, तिने आता या बातम्या अफवा सांगितल्या आहेत. प्रीतीने टिष्ट्वटरवर सांगितले की, ‘सांगायला मला थोडंसं विचित्र वाटते आहे. मी जानेवारीत लग्न करणार नाही. मी तुम्हाला प्रॉमिस करते की, मी जेव्हा लग्न करेन, तेव्हा अगोदरच सांगेन.’