दिग्दर्शनात घराणेशाही अपयशीच

By Admin | Updated: October 22, 2015 02:32 IST2015-10-22T02:32:51+5:302015-10-22T02:32:51+5:30

घराणेशाही केवळ राजकारणातच नसते. बॉलीवूडमध्येदेखील कुटुंबाचा वारसा संभाळण्यासाठी अनेक स्टार मंडळींनी आपल्या वारसदारांना अभिनयाच्या क्षेत्रात उतरविले

Directional failure in directing | दिग्दर्शनात घराणेशाही अपयशीच

दिग्दर्शनात घराणेशाही अपयशीच

घराणेशाही केवळ राजकारणातच नसते. बॉलीवूडमध्येदेखील कुटुंबाचा वारसा संभाळण्यासाठी अनेक स्टार मंडळींनी आपल्या वारसदारांना अभिनयाच्या क्षेत्रात उतरविले आणि यातले अनेक जण यशस्वीही झाले आहेत. मात्र, दिग्दर्शनात घराणेशाही जास्त यशस्वी ठरली नाही, याचे सर्वात मोठे उदाहरण शोमॅन राजकपूर आहेत. त्यांची तीनही मुले रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर अभिनेता झाले, तिघेही दिग्दर्शनात आले, परंतु यशस्वी होऊ श्कले नाहीत. म्हणूनच तिघांमधून कोणीही दिग्दर्शनात पुनरागमनाचा प्रयत्न केला नाही.

असे आणखी एक कुटुंब आहे, ज्यांच्या दुसरी पिढीने आपल्या वडिलांचा वारसा संभाळला. मात्र, यशाच्या बाबतीत दोन्ही कुटुंबांची पुढची पिढी वेगळ््या मार्गावर गेली. बी.आर. चोपडा यांनी आपल्या चित्रपटांनी यशाचा इतिहास रचला. मात्र, नुकतेच निधन झालेले त्यांचे पुत्र रवि चोपडा यांना दिग्दर्शनात आपल्या वडिलांप्रमाणे यश मिळाले नाही. रवि चोपडा यांच्या दिग्दर्शनातील यशस्वी चित्रपटात अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला ‘बागवां’ होता, ज्याची पटकथा बी.आर. यांनी खूप पूर्वी लिहिली होती. अमिताभसोबत त्याच लाइनवरील रवि चोपडा यांच्या ‘बाबूल’ चित्रपटाला मात्र यश मिळाले नाही. आदित्य चोपडा यांनी मात्र वडिलांच्या यशाचा वारसा सांभाळला. आदित्य चोपडाने यश चोपडा असतानाच यशराजची जबाबदारी सांभाळली होती. यशाच्या बाबतीत आदित्य कुठेही आपल्या वडिलांपेक्षा मागे नाही. त्याने खूप वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमानाची घोषणा केली व त्यासाठी त्याने आपल्या वडिलांचा जन्मदिवस निवडला. घोषणेच्या वेळी वडिलांसोबतच्या संवादाचे एक भावनिक पत्रदेखील मीडियाच्या नावाने काढले. नासिर हुसैन आपल्या काळातील एक यशस्वी निर्माते राहिले. त्यांचे पुत्र मंसूर खानदेखील यशाच्या शिखरावर पोहोचले. आमीर खानसोबत मंसूर यांनी ‘कयामत से कयामत तक’च्या यशाचा इतिहास लिहिला. जो जीता वही सिकंदर, अकेले हम अकेले तुम आणि जोश चित्रपटांच्या यशानंतर मात्र ते दिग्दर्शनापासून दूर होत गेले. बी.आर. आणि यश चोपडा यांच्या काळातीलच आणखी एक निर्माते रामानंद सागर यांची दोन्ही मुले प्रेम आणि मोती सागर दिग्दर्शनात आली. मात्र, आपल्या वडिलांसारखे यश मिळवू शकली नाहीत. - ंल्ल४्न.ं’ंल्ल‘ं१@’ङ्म‘ें३.ूङ्मे

Web Title: Directional failure in directing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.