करणच्या वी आर इंडियन्समध्ये दिशा
By Admin | Updated: September 23, 2014 06:36 IST2014-09-23T06:36:08+5:302014-09-23T06:36:08+5:30
निर्माता करण जौहर वी आर इंडियन्स नावाचा एक चित्रपट बनवत असून त्यात मुख्य भूमिकेसाठी मॉडेल दिशा पाटणीची निवड करण्यात आली

करणच्या वी आर इंडियन्समध्ये दिशा
निर्माता करण जौहर वी आर इंडियन्स नावाचा एक चित्रपट बनवत असून त्यात मुख्य भूमिकेसाठी मॉडेल दिशा पाटणीची निवड करण्यात आली आहे. दिशा मॉडेलिंगच्या दुनियेत लोकप्रिय आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनम नायर करीत आहेत. सोनमने यापूर्वी गिप्पी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. वी आर इंडियन्स या चित्रपटाचे स्क्रिप्टही सोनमनेच लिहिले आहे. करणलाही या चित्रपटाचे स्क्रिप्ट आवडले आहे. चित्रपटाची निर्मिती करण जौहर आणि एकता कपूर करणार आहेत. दिशाचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. यापूर्वी ती अनेक जाहिरातींत झळकली आहे.