दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:37 IST2025-08-19T13:34:41+5:302025-08-19T13:37:57+5:30

दिलीप प्रभावळकरांचा स्क्रीनवरील वावर, त्यांची भेदक नजर पाहून कोणीही थरथर कापेल. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने , तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘दशावतार ‘!

dilip prabhavalkar starrer dashavatar trailer released story based on konkan traditional folk | दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

कोकणातील प्रसिद्ध 'दशावतार' (Dashavatar) आता मोठ्या पडद्यावर येतोय. मराठी कलाकारांची तगडी स्टारकास्ट, एकापेक्षा एक डायलॉग, भयावह अन् रोमांचकारी दृश्य पाहून मराठी प्रेक्षक प्रभावित झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टारर ‘दशावतार ‘ येत्या १२ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 

'दशावतार' चित्रपटाचं पोस्टर, त्याचा पहिला लूक आणि चित्रपटातील पहिलंच गाणं  'आवशीचो घो' यांनी आधीच रसिकांच्या मनात तुफान उत्सुकता निर्माण केलीय. सिनेमाचा ट्रेलर नुकताच आला आहे. दिलीप प्रभावळकरांचा स्क्रीनवरील वावर, त्यांची भेदक नजर पाहून कोणीही थरथर कापेल. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने , तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘दशावतार ‘! कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराया, देवरायांचे राखणदार यांची गूढरम्यता म्हणजे दशावतार! कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट म्हणजे ‘दशावतार ‘ आहे!! अर्थपूर्ण कथा, दमदार अभिनय आणि कर्णमधूर संगीत यांचा अप्रतिम संगम म्हणजेच हा ‘दशावतार’!



लेखक सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटाच्या कथा - पटकथा लेखनाबरोबरच दिग्दर्शनाची प्रथमच स्वतंत्रपणे धुरा सांभाळली आहे. गुरू ठाकूर यांनी संवाद आणि गीतलेखन केले आहे. तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. ‘दशावतार ‘ चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबरच सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी केली आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत. या चित्रपटात विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: dilip prabhavalkar starrer dashavatar trailer released story based on konkan traditional folk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.