राजकुमार रावने केली प्लास्टिक सर्जरी?, खुलासा करत अभिनेता म्हणाला - "मला लोकांना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 06:08 PM2024-04-20T18:08:52+5:302024-04-20T18:09:15+5:30

Rajkumar Rao : अभिनेता राजकुमार रावला त्याच्या हनुवटीच्या प्लास्टिक सर्जरीवरून बऱ्याच दिवसांपासून ट्रोल केले जात होते. आता अभिनेत्याने या चर्चेवर मौन सोडले आहे.

Did Rajkumar Rao undergo plastic surgery?, the actor revealed - "I want people to..." | राजकुमार रावने केली प्लास्टिक सर्जरी?, खुलासा करत अभिनेता म्हणाला - "मला लोकांना..."

राजकुमार रावने केली प्लास्टिक सर्जरी?, खुलासा करत अभिनेता म्हणाला - "मला लोकांना..."

अनेकदा कलाकार कॅमेऱ्यासमोर चांगले दिसण्यासाठी शस्त्रक्रियेचा अवलंब करतात. बऱ्याच सेलिब्रिटींनी हे केले आहे आणि अभिनेता राजकुमार राव(Rajkumar Rao)चे नवीन फोटो पाहून लोकांनीही असेच म्हटले आहे. अनेक दिवसांपासून त्याचा एक फोटो व्हायरल होत होता ज्यामध्ये तो नेहमीपेक्षा वेगळा दिसत होता. सोशल मीडियावर लोक राजकुमार रावबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते पण आता अभिनेत्याने त्याला उत्तर दिले आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या श्रीकांत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, इंडिया टुडेशी बोलताना तो प्लास्टिक सर्जरीच्या अफवेवरही मोकळेपणाने बोलला, ज्यात त्याने आपल्या बदललेल्या स्टाइलचे रहस्य सांगितले. एबीपीशी बोलताना राजकुमार रावला विचारण्यात आले की, 'सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुमच्या हनुवटीवर प्लास्टिक सर्जरी केल्याचे बोलले जात आहे. त्या अफवेत तथ्य आहे का?'  यावर राजकुमार रावने उत्तर दिले की, 'जेव्हा मी तो फोटो पाहिला तेव्हा मलाही आश्चर्य वाटले होते की तो मीच आहे का?. हे खरे आहे की 8-9 वर्षांपूर्वी मी एक छोटासा फिलर घातला होता.

राजकुमार पुढे म्हणाला, मला सांगण्यात आले होते की यामुळे माझा चेहरा संतुलित होईल. मी कोणतीही प्लास्टिक सर्जरी केलेली नाही. मी स्वतःला चांगले दिसण्यासाठी फिलर्स देखील केले आहेत. त्यानंतरच मी अनेक चित्रपट केले आहेत आणि जर तुम्ही स्वतःला चांगले दिसण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करू शकत असाल तर का नाही पण तुम्ही असे काहीही करू नये ज्यामुळे तुम्ही आहात त्यापेक्षा वेगळे दिसाल.

'श्रीकांत' कधी येणार भेटीला?
तुषार हिरानंदानी दिग्दर्शित श्रीकांत हा चित्रपट एक बायोपिक आहे. यामध्ये राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे जो श्रीकांत बोल्ला यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. श्रीकांत हे एक अंध व्यक्ती असून ते व्यावसायिक आहेत. त्यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. श्रीकांत हा चित्रपट १० मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. यात राजकुमार व्यतिरिक्त ज्योतिका, आलया एफ आणि शरद केळकर हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

Web Title: Did Rajkumar Rao undergo plastic surgery?, the actor revealed - "I want people to..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.