आमिर-सलमानसोबत काम करण्याची इच्छा - कृती
By Admin | Updated: July 20, 2015 02:16 IST2015-07-20T02:16:54+5:302015-07-20T02:16:54+5:30
बॉलीवूडमधील नवोदित अभिनेत्री कृती सेनन आता सलमान खान आणि आमिर खानसोबत काम करू इच्छिते. २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीरोपंती’

आमिर-सलमानसोबत काम करण्याची इच्छा - कृती
बॉलीवूडमधील नवोदित अभिनेत्री कृती सेनन आता सलमान खान आणि आमिर खानसोबत काम करू इच्छिते. २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीरोपंती’ चित्रपटात तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. सध्या ती शाहरूख खानसोबत ‘दिलवाले’ चित्रपटात काम करत आहे. ती म्हणाली, ‘मला शाहरूखसोबत काम करायची संधी मिळाली त्यामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजते. मला आमिर आणि सलमान यांच्यासोबतही काम करण्याची इच्छा आहे. हे दोघे असे आहेत की, यांना मी आयुष्यात पडद्यावरच पाहिले. जेव्हा मी यांना माझ्या स्वत:सोबत पाहते तेव्हा मला खरे वाटते की, मी अभिनेत्री आहे.