‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 06:16 IST2025-10-09T06:15:41+5:302025-10-09T06:16:01+5:30
आर्थिक गुन्हे शाखेने राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांच्यावर करण्यात आलेल्या फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करत असताना ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी केले.

‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असल्याने आधी तितकीच रक्कम जमा करा मगच परदेशात जाण्याच्या याचिकेवर विचार करू, अशी अट मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यासमोर ठेवली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांच्यावर करण्यात आलेल्या फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करत असताना ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी केले. या नोटिशीला राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुख्य न्या. चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. तिला २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान लॉस एंजेलिसला कामानिमित्त प्रवास करायचा आहे.
न्यायालय संतापले!
तपासात सहकार्य करत असल्यानेच अटक करण्यात आली नाही. बस्स झाले, त्यांची चौकशी सुरू असल्याने आम्ही त्यांना परदेश प्रवासाची परवानगी देऊ शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने शिल्पाच्या वकिलांच्या युक्तिवादावर व्यक्त केला.
परदेशी दौऱ्यावर जात असल्याचे शिल्पाच्या वकिलांनी सांगितल्यावर न्यायालयाने दौरा आयोजकाचे आणि शेट्टी यांचे फोनवरील संभाषण तपास यंत्रणेला उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.