दीपिकाच्या हॉलीवूडपटाने कमावले 20162.52 कोटी
By Admin | Updated: February 22, 2017 16:58 IST2017-02-22T16:56:49+5:302017-02-22T16:58:32+5:30
दीपिका पादुकोनच्या पहिला हॉलिवूड चित्रपटाने चित्रपटाने 'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' ने संपूर्ण जगभरात 308 मिलियन डॉलर

दीपिकाच्या हॉलीवूडपटाने कमावले 20162.52 कोटी
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - दीपिका पादुकोनच्या पहिला हॉलिवूड चित्रपट 'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' ने संपूर्ण जगभरात 308 मिलियन डॉलर म्हणजेच 20162 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 14 जानेवारी रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाल्यानंतर तिकीटखिडकीवरील सर्व रेकॉर्ड तोडत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट झाला आहे. दीशा पटानी, सोनू सूद आणि जॅकी चेनचा कंफू योगानेही तूफान कमाई केली आहे. 243.6 मिलियन डॉलर (1632 कोटी) रुपयांची कमाई केली आहे.
दीपिकाच्या 'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' चीनमध्ये सर्वाधिक पसंती मिळाली आहे. चीनी बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने पहिल्या दहा दिवसात 137 मिलियन रुपयाचा गल्ला जमवला आहे. चीनमध्ये एकाचवेळी 6600 पडद्यावर हा चित्रपट प्रदर्शित झाला. चीनमध्ये प्रदर्शनाला सर्वाधिक कमाई करणारा हा हॉलिवूडपट ठरला आहे.
'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' मध्ये दीपिकासोबत 48 वर्षीय विन डीजेलने यामध्ये 'Xander Cage' ची भूमिका निभावली आहे. तर दीपिका 'Serena'च्या भूमिकेत आहे. दीपिकाच्या बाजीराव-मस्तानीने जगभरात 360 कोटींची कमाई केली होती.