दीपिकाला अपयशाची भीती नाही

By Admin | Updated: September 1, 2014 23:00 IST2014-09-01T23:00:58+5:302014-09-01T23:00:58+5:30

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोन अपयशाला घाबरत नाही. तिच्या मते तिचे करिअर नेहमीच टॉपवर राहील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही.

Deepika is not afraid of failure | दीपिकाला अपयशाची भीती नाही

दीपिकाला अपयशाची भीती नाही

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोन अपयशाला घाबरत नाही. तिच्या मते तिचे करिअर नेहमीच टॉपवर राहील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. रेस-2, ये जवानी है दिवानी, चेन्नई एक्स्प्रेस आणि गोलियो की रासलीला रामलीला सारख्या चित्रपटांच्या यशानंतर दीपिकाचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जात आहेत. ती म्हणाली, ‘मी आजवर केलेल्या कठोर मेहनतीचे हे फळ आहे. मागील तीन-चार चित्रपटांमध्ये मी वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत.  त्यामुळे मी खुश आहे. लोकांना काय आवडते आणि काय नाही, यावर एखाद्याचे करिअर अवलंबून असते. ज्यांना माङो चित्रपट पाहायला आवडत नव्हते, तेच लोक माङो चित्रपट पाहत आहेत. माङो करिअर नेहमीच टॉपवर राहू शकत नाही.’

 

Web Title: Deepika is not afraid of failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.