दीपिकाच माझी भूमिका करू शकते : सानिया
By Admin | Updated: November 17, 2014 02:00 IST2014-11-17T02:00:39+5:302014-11-17T02:00:39+5:30
‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कोम’च्या यशामुळे खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्याचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये रुळला आहे. आता टेनिसस्टार सानिया मिर्झा हिच्या जीवनावर चित्रपट येणार

दीपिकाच माझी भूमिका करू शकते : सानिया
‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कोम’च्या यशामुळे खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्याचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये रुळला आहे. आता टेनिसस्टार सानिया मिर्झा हिच्या जीवनावर चित्रपट येणार असल्याची चर्चा रंगली आहे. ‘चित्रपट बनविण्याच्या आॅफर यापूर्वी मी ठोकरल्या आहेत. खासगी जीवन सार्वजनिक करणे मला कदापिही पसंत नाही. त्यामुळे चित्रपट तयार होईल का नाही, हे सांगता येत नाही; परंतु भविष्यात तसा प्रयत्न झालाच तर केवळ दीपिका पदुकोणमध्येच पडद्यावरील सानिया साकारण्याची क्षमता आहे, असा दावा सानियाने केला आहे. सानिया सध्या आपले आत्मचरित्र लिहीत आहे. आत्मचरित्राचे २६ भाग लिहून पूर्ण झाले आहेत. माझ्याबद्दल आतापर्यंत अनेकदा चुकीच्या बातम्या छापून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वत:ची कहाणी चाहत्यांना सांगण्याच्या निर्धारानेच आत्मचरित्राचे काम हाती घेतले आहे, असे सानियाने स्पष्ट केले.