28 दिवसानंतरही दंगल हाऊसफुल, कमाई वाचून व्हाल थक्क

By Admin | Updated: January 22, 2017 18:03 IST2017-01-22T18:03:57+5:302017-01-22T18:03:57+5:30

कमाईमध्ये सर्वच विक्रम मागे टाकणाऱ्या कुस्तीवर आधारीत दंगल चित्रपट 28 दिवसांनतरही सिनेमागृहात हाऊसफूल आहे.

Dangle Houseful after 28 days, reading earnings will be tired | 28 दिवसानंतरही दंगल हाऊसफुल, कमाई वाचून व्हाल थक्क

28 दिवसानंतरही दंगल हाऊसफुल, कमाई वाचून व्हाल थक्क

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - कमाईमध्ये सर्वच विक्रम मागे टाकणाऱ्या कुस्तीवर आधारीत दंगल चित्रपट 28 दिवसांनतरही सिनेमागृहात हाऊसफूल आहे. रिलीजच्या चार आठवड्यानंतर आमीर खानच्या दंगलने तिकीटखिडकीवर 375 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करत नवा विक्रम केला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकच्या पसंतीस उतरलेल्या  दंगलने शुक्रवार पर्यंत 376.14 कोटीची कमाई  केली आहे. दंगलची जोरदार घोडदौड सुरु असून हा चित्रपट 400 कोटींचा टप्पाही ओलांडू शकतो. देशाबरोबर विदेशातही दंगलने चांगली कमाई केली आहे
 
आमीर खानच्या अभिनयाने सजलेला आणि नितेश तिवारी दिग्दर्शित दंगल 23 डिसेंबर 2016 रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमीर सोबतच फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा आणि साक्षी तंवर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
 
दंगल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरक्ष: कमाईची दंगल केली आहे. 'दंगल' चित्रपटाने पहिल्या पाच दिवसांमध्ये तब्बल 155 कोटींची कमाई केली होती तर 100 कोटींची टप्पा तर फक्त तीन दिवसांमध्ये पार केला होता. 
 
'दंगल' चित्रपटात आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारताना दिसत असून त्याने घेतलेल्या मेहनतीचं कौतूक केलं जात आहे. सोबतच इतर अभिनेत्यांनीही चांगलं काम केल्याची पावती प्रेक्षकांकडून मिळत आहे. चित्रपटात महावीर फोगट यांनी आपल्या दोन मुली, गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे.
 

Web Title: Dangle Houseful after 28 days, reading earnings will be tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.