सलमानकडून डायसीला 'कार' गिफ्ट

By Admin | Updated: March 13, 2016 16:59 IST2016-03-13T16:58:55+5:302016-03-13T16:59:41+5:30

पक्की मैत्री आणि दिलदार स्वभावासाठी ओळखला जाणारा सलमान आपल्याबरोबरच्या सहकलाकारांना मदत करताना फायदा-तोटयाचा अजिबात विचार करत नाही.

Daisy 'car' gift from Salman | सलमानकडून डायसीला 'कार' गिफ्ट

सलमानकडून डायसीला 'कार' गिफ्ट

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १३ - बॉलिवूडमध्ये सलमान खान अनेकांसाठी गॉडफादर आहे. पक्की मैत्री आणि दिलदार स्वभावासाठी ओळखला जाणारा सलमान आपल्याबरोबरच्या सहकलाकारांना मदत करताना फायदा-तोटयाचा अजिबात विचार करत नाही. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये सलमानच्या शब्दाला वजन आहे. 
सलमानच्या दिलदारपणाचे आणखी एक उदहारण समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसास सलमानने 'जय हो' ची को-स्टार डायसी शहाला एक नवी आलिशान गाडी भेट केली आहे. 
सलमान आणि डायसीमध्ये चांगली मैत्री आहे. यापूर्वी कतरिना कैफ बरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. त्यावेळीही सलमानने तिला आलिशान गाडी भेट केली होती. पण प्रेम प्रकरण संपुष्टात आल्यानंतर कॅटने ती गाडी विकून टाकली. 
 

Web Title: Daisy 'car' gift from Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.