काळजी करून दमलेला बाबा
By Admin | Updated: June 19, 2016 03:53 IST2016-06-19T03:53:03+5:302016-06-19T03:53:03+5:30
वडील हे जरी दिवसभर कामासाठी घराबाहेर असले, तरी त्यांना आपल्या मुलांची सतत काळजी असतेच अन् त्यातही जास्त काळजी मुलीची असते. असे म्हणतात की, मुलगी

काळजी करून दमलेला बाबा
वडील हे जरी दिवसभर कामासाठी घराबाहेर असले, तरी त्यांना आपल्या मुलांची सतत काळजी असतेच अन् त्यातही जास्त काळजी मुलीची असते. असे म्हणतात की, मुलगी ही तिच्या बाबांना जास्त जवळची असते. सध्या समाजात घडणाऱ्या विविध घटना अन् मुलींवर होणारे अन्याय-अत्याचार या गोष्टी वाढल्याने आजच्या मुली सुरक्षित नाहीत, असे वातावरण निर्माण झाले आहे. याच विषयाला अनुसरून ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. आता नावारूनच तुम्हाला समजले असेल की, ही कहाणी एका दमलेल्या बाबाची आहे, परंतु हा बाबा नक्की का दमलाय, त्याला कशाची एवढी काळजी, चिंता आहे की, तो दमलाय तर या प्रश्नाचे उत्तर आहे, हा बाबा त्याच्या मुलीची काळजी करून दमलेला आहे. आपल्या मुलीच्या काळजीने आयुष्यभर त्रासलेला बाबा यामध्ये दाखविण्यात आला आहे. संदीप खरे यांनी या बाबाची भूमिका केली असून, संस्कृती बालगुडेने त्यामध्ये मुलीचा रोल केला आहे.