काजोल-ट्विंकलच्या शोमध्ये 'कंडोम'वरून पेटला वाद, सोनाक्षीने विचारलेल्या प्रश्नावर अभिनेत्रीला आवरलं नाही हसू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 11:43 IST2025-11-24T11:42:22+5:302025-11-24T11:43:10+5:30
Kajol-Twinkle Khanna's show Too Much : अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा 'टू मच' हा चॅट शो सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूडमधील सेलिब्रिटी पाहुणे म्हणून येत असतात. या शोच्या सहाव्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा पाहुणे म्हणून आले होते.

काजोल-ट्विंकलच्या शोमध्ये 'कंडोम'वरून पेटला वाद, सोनाक्षीने विचारलेल्या प्रश्नावर अभिनेत्रीला आवरलं नाही हसू
अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा 'टू मच' हा चॅट शो सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूडमधील सेलिब्रिटी पाहुणे म्हणून येत असतात. या शोच्या सहाव्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा पाहुणे म्हणून आले होते. या एपिसोडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यात सर्वजण कंडोम खरेदी करण्याबद्दल भारतीयांची मानसिकता यावर चर्चा करताना दिसत आहेत.
या चॅट शोमध्ये एक सेगमेंट आहे, ज्यात पाहुण्यांना चर्चेसाठी एक विषय दिला जातो. जर ते त्या विषयाचे समर्थन करत असतील, तर ते त्याला डिफेंड करतात आणि समर्थन करत नसतील तर विरोधात बोलतात. सोनाक्षी सिन्हा आणि मनीष मल्होत्रा यांच्या एपिसोडमध्ये 'भारतीय लोक फेअरनेस क्रीम खरेदी करण्याच्या तुलनेत कंडोम खरेदी करताना जास्त लाज वाटून घेतात' या विषयावर चर्चा झाली. या विषयाचे ट्विंकल खन्ना आणि मनीष मल्होत्रा यांनी समर्थन केले नाही. तर सोनाक्षी सिन्हा आणि काजोल यांचे मत होते की, कंडोम खरेदी करताना भारतीय लोक कचरतात आणि लाजतात.
भारतीयांना कंडोम खरेदी करताना वाटते लाज
काजोल म्हणते, "लोकांना लाज वाटते. फेअरनेस क्रीम खरेदी करायला गेल्यास अगदी सहजपणे 'ती शाहरुख खानची क्रीम द्या' असे म्हणतात. पण कंडोम खरेदी करताना कचरतात आणि लाजतात. 'माझा मित्र घेऊन येईल,' असे म्हणतात." यावर मनीष मल्होत्रा म्हणाला की, "असे अजिबात नाही. भारत बदलला आहे." ट्विंकल खन्नानेही मनीषच्या मताला पाठिंबा दिला. तेव्हा काजोल म्हणाली, "तू मेडिकल स्टोअरमध्ये किती वेळा गेली आहेस?" यावर ट्विंकल खन्ना उत्तर देते, "मी सॅनिटरी पॅड्ससाठी जाईन, कंडोमसाठी नाही. तो दुसऱ्या कोणाचा तरी विभाग आहे."
सोनाक्षीच्या प्रश्नामुळे काजोलला आवरले नाही हसू
या दरम्यान मनीष मल्होत्रा पुन्हा म्हणाला की, "भारत बदलला आहे आणि आता असे काही नाही. कंडोम खरेदी करताना कोणालाही कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही." यावर सोनाक्षी सिन्हाने विचारले, "तर मग आपली लोकसंख्या इतकी जास्त का आहे?" हे ऐकून काजोल हसली. सोनाक्षी सिन्हा पुढे म्हणाली की, "यावरून हे स्पष्ट होते की बहुतेक लोक कंडोम खरेदी करत नाहीत." तरीही मनीष मल्होत्रा यांनी आपले मत कायम ठेवत म्हणाले की, "मला तसे वाटत नाही."