कॉमेडी नाईट्स विथ कपिल बंद होणार
By Admin | Updated: June 16, 2014 11:52 IST2014-06-15T17:09:43+5:302014-06-16T11:52:57+5:30
प्रेक्षकांना खदखदून हसवणारा कॉमेडी नाइट्स विथ कपिल हा शो सप्टेंबरमध्ये बंद होणार आहे. शोचा निर्माता व होस्ट कपिल शर्माने ट्विटरद्वारे हा शो बंद होणार असल्याची घोषणा केली आहे.

कॉमेडी नाईट्स विथ कपिल बंद होणार
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १५ - अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खदखदून हसवणारा कॉमेडी नाइट्स विथ कपिल हा शो सप्टेंबरमध्ये बंद होणार आहे. शोचा निर्माता व होस्ट कपिल शर्माने ट्विटरद्वारे हा शो बंद होणार असल्याची घोषणा केली असून नवीन पात्र आणि सेटसह हा शो पुन्हा सुरु करु असे कपिलने म्हटले आहे.
कलर्स वाहिनीवर कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो प्रसारित होतो. या शोमध्ये कपिल व त्याच्या सहका-यांच्या अफलातून कॉमेडीने प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या शोच्या वाढत्या टीआरपीमुळे अनेक दिग्गज कलाकारांनी चित्रपटाचे प्रोमोशन करण्यासाठी कॉमेडी नाईट्समध्ये हजेरी लावली. मात्र हा शो आता प्रेक्षकांना अलविदा करणार आहे. रविवारी कपिल शर्माने ट्विटरद्वारे हा शो बंद होणार असल्याची घोषणा केली आहे.