'कॉमेडी क्वीन' भारती सिंग युट्यूबवरून किती कमावते, स्वतःच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:30 IST2025-08-22T12:28:42+5:302025-08-22T12:30:34+5:30

भारतीनं तिच्या युट्यूबवरुन होणाऱ्या उत्पन्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Comedian Bharti Singh Reveals Income From Youtube Channel In Raj Shamani Podcast | 'कॉमेडी क्वीन' भारती सिंग युट्यूबवरून किती कमावते, स्वतःच केला खुलासा

'कॉमेडी क्वीन' भारती सिंग युट्यूबवरून किती कमावते, स्वतःच केला खुलासा

Bharti Singh Income: भारती सिंग (Bharti Singh) ही ही हिंदी सिनेसृष्टीमधील एक अभिनेत्री आणि कॉमेडियन आहे. विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे तिच्या कामाचं प्रचंड कौतुक होतं. टीव्हीवर प्रेक्षकांना हसवणाऱ्या भारतीचं आता डिजिटल जगतातही वर्चस्व निर्माण झालं आहे. भारतीचे स्वत:चे दोन युट्यूब चॅनलदेखील आहेत. BHARTI TV या चॅनलवर ती पॉडकास्ट करते. तर LOL (Life of Limbachiyaa’s) या चॅनलवर रोज व्लॉग अपलोड करत असते. नुकतंच भारतीनं तिच्या युट्यूबवरुन होणाऱ्या उत्पन्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

भारती सिंगच्या कमाईमध्ये टीव्हीसोबतच यूट्यूबचाही मोठा वाटा आहे. राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत भारती सिंगने तिच्या कमाईवर भाष्य केलं. भारती म्हणाली, की तिच्या एकूण कमाईपैकी ६० टक्के हिस्सा टीव्हीमधून येतो, तर उर्वरित ४० टक्के कमाई ती यूट्यूबमधून करते. "मी टीव्हीवर एका दिवसात जेवढे पैसे कमावते, तेवढे यूट्यूबवर एका महिन्यात कमावते. मला दोन्ही माध्यमं खूप आवडतात" असेही ती म्हणाली. भारतीचं हे यश पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

भारती तिच्या या कमाईचं श्रेय ती तिचा पती हर्ष लिंबाचिया याला देते. सुरुवातीला यूट्यूबबद्दल फारशी माहिती नसतानाही हर्षने तिला या माध्यमाचं महत्त्व पटवून दिलं, असं भारती म्हणाली. हर्षने तिला सांगितलं होतं की, टीव्हीचं काम कायमस्वरूपी नसतं, त्यामुळे यूट्यूबवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे.

भारतीच्या एका यूट्यूब चॅनेलचे ७.७८ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत, तर दुसऱ्या चॅनेलला ३० लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. भारतीच्या पॉडकास्ट चॅनलवर तिनं आणि हर्षनं आतापर्यंत मनोरंजन क्षेत्रातील अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. जितेंद्र कुमार, अवनीत कौर, अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी, एल्विश यादवसह बऱ्याच जणांनी भारतीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली आहे. भारतीच्या मते, मेहनती आणि समर्पित राहिल्यास यूट्यूबसुद्धा भरभरून पैसा देतं.

 

Web Title: Comedian Bharti Singh Reveals Income From Youtube Channel In Raj Shamani Podcast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.