चित्रांगदा आता निर्माती
By Admin | Updated: March 26, 2015 23:22 IST2015-03-26T23:22:51+5:302015-03-26T23:22:51+5:30
‘हजारो ख्वाइशे ऐसी...’ फेम अभिनेत्री-मॉडेल चित्रांगदा सिंह आता निर्मातीच्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

चित्रांगदा आता निर्माती
‘हजारो ख्वाइशे ऐसी...’ फेम अभिनेत्री-मॉडेल चित्रांगदा सिंह आता निर्मातीच्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अनुष्का शर्मानंतर आता चित्रांगदानेही एका हटके कलाकृतीची निर्मिती करण्याचा ध्यास घेतला आहे, मात्र याविषयी आताच कोणतीही वाच्यता करण्यात तिला रस नाही. ती निर्मातीच्या भूमिकेत असलेला पहिला चित्रपट क्रीडाक्षेत्रावर आधारित असल्याचे कानावर आले आहे.