'ए दिल...'वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
By Admin | Updated: October 22, 2016 11:13 IST2016-10-22T09:13:11+5:302016-10-22T11:13:13+5:30
'ऐ दिल है मुश्किल'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईमुळे मोकळा झाला आहे.

'ए दिल...'वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - 'ए दिल है मुश्कील'च्या प्रदर्शनावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. वर्षा निवासस्थानी त्यांनी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि निर्माता करण जोहरशी चर्चा केली.
यावेळी बॉलिवूड निर्मात्यांच्यावतीने मुकेश भट्ट यांनी यापुढे पाकिस्तानी कलाकरांसोबत काम करणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले तसेच सिनेमातील उत्पन्नाचा काही वाटा आर्मी वेलफेअर फंडाला देणार असल्याची माहिती दिली. यावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या चित्रपटाची मुश्किल मिटली की, कायम रहाणार ते स्पष्ट झालेले नाही.
आणखी बातम्या
दरम्यान 20 ऑक्टोबर रोजी ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाच्या प्रदर्शनात कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने सिनेमाच्या निर्मात्यांसह करण जोहरला दिले होते.
MNS Chief Raj Thackeray to meet Maharashtra CM Devendra Fadnavis shortly— ANI (@ANI_news) October 22, 2016