करिश्माची आलियाला टक्कर
By Admin | Updated: December 10, 2014 00:22 IST2014-12-10T00:22:03+5:302014-12-10T00:22:03+5:30
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या सामान्य ज्ञानाची सोशल नेटवर्किग साईटवर खिल्ली उडवली जाते; पण आता आलियाला टक्कर देण्यासाठी आणखी एक अभिनेत्री रिंगणात आली आहे.

करिश्माची आलियाला टक्कर
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या सामान्य ज्ञानाची सोशल नेटवर्किग साईटवर खिल्ली उडवली जाते; पण आता आलियाला टक्कर देण्यासाठी आणखी एक अभिनेत्री रिंगणात आली आहे. सध्या बिग बॉसच्या घरात असलेली सुंदर अभिनेत्री करिश्मा तन्ना जनरल नॉलेजबाबत आलियाएवढीच ‘हुशार’ आहे. नुकतेच या शोमध्ये सलमान खानने स्पर्धकांना राजकारण, गणित अणि इतर क्षेत्रतील सामान्य ज्ञानाबाबत प्रश्न विचारले. घरातील सदस्यांपैकी फक्त प्रीतमलाच जनरल नॉलेजच्या एका प्रश्नाचे उत्तर देता आले. सलमानने जेव्हा राष्ट्रपती कोण आहेत, असा प्रश्न विचारला, तेव्हा करिश्माने नरेंद्र मोदी असे उत्तर दिले. एवढेच नव्हे, तर शून्याने एखाद्या संख्येला गुणल्यानंतर काय उत्तर येते याचेही उत्तर करिश्माला व्यवस्थित देता आले नाही. एवढेच नव्हे, तर सोनाली राऊत आणि डायंड्राही करिश्मापेक्षा जराही मागे नाहीत. दुर्योधनाला किती भाऊ होते, हे सोनालीला सांगता आले नाही, दुसरीकडे डायंड्रा तर झारखंडला कोणतीच राजधानी नसल्याचे म्हणते.