सेलीब्रिटींचाही कृष्णाच्या ‘शो’ला ठेंगा
By Admin | Updated: July 28, 2016 02:13 IST2016-07-28T02:13:26+5:302016-07-28T02:13:26+5:30
आधी हृतिक रोशन नंतर खिलाडी अक्षय कुमार आणि आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ या शोमध्ये हजेरी लावण्यास

सेलीब्रिटींचाही कृष्णाच्या ‘शो’ला ठेंगा
आधी हृतिक रोशन नंतर खिलाडी अक्षय कुमार आणि आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ या शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिलाय. ‘हाऊसफुल्ल-3’ सिनेमाच्या कृष्णाच्या या कॉमेडी शोमध्ये आलेल्या अनुभवामुळे जॅकलीननं या शोमध्ये येण्यास नकार दिलाय. कॉमेडी नाईट्स बचाओच्या टीमने जॅकलीन आणि तिची ‘हाऊसफुल्ल-3’ सिनेमामधील कोस्टार लिसा हेडनबाबत काही शेरबाजी
केली होती. त्यामुळे जॅकलीन या शोवर नाराज आहे. त्यामुळे आगामी ढिश्शूम सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’च्या
सेटवर न जाण्याचा निर्णय जॅकलीन आणि वरुणने घेतलाय..