बॉलीवूडमधील बॉक्सिंगपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 02:37 IST2016-01-31T02:37:47+5:302016-01-31T02:37:47+5:30
या शुक्रवारी प्रदर्शित झालेला राजकुमार हिरानीच्या प्रोडक्शन कंपनीचा ‘साला खुड़ूस’ अशा चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला, जो बॉक्सिंगवर आधारित आहे. बॉक्सिंगवरील चित्रपटांची यादी मनोरंजक आहेच

बॉलीवूडमधील बॉक्सिंगपट
या शुक्रवारी प्रदर्शित झालेला राजकुमार हिरानीच्या प्रोडक्शन कंपनीचा ‘साला खुड़ूस’ अशा चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला, जो बॉक्सिंगवर आधारित आहे. बॉक्सिंगवरील चित्रपटांची यादी मनोरंजक आहेच, कारण ज्या देशात क्रिकेट हा सर्वमान्य खेळ मानला जात असताना त्यापेक्षा जास्त चित्रपट दुसऱ्या खेळांवर बनलेले आहेत, ज्यात बॉक्सिंगचादेखील समावेश आहे.
बॉक्सिंग या खेळावर आधारित पहिला चित्रपट १९८२ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘मैं इंतकाम लूंगा’ या चित्रपटात धर्मेंद्र लीड रोलमध्ये होता. मात्र हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. दोन वर्षांनंतर १९८४ मध्ये मिथुन चक्रवर्तीने प्रोडक्शनच्या मैदानात उतरून ‘बॉक्सर’ हा चित्रपट बनविला, ज्याच्यासाठी त्यांनी पैसा पाण्यासारखा खर्च केला. मात्र बॉक्स आॅफिसवर ‘बॉक्सर’ अपयशी ठरला आणि मिथुनला निर्माता म्हणून मोठा तोटा सहन करावा लागला.
९० च्या दशकात असे प्रयोग झाले नाहीत. २००६ साली सोहेल खानने ‘आर्यन’ चित्रपटात बॉक्सरची भूमिका केली होती. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपटदेखील अपयशी ठरला. धर्मेंद्र, सनी आणि बॉबी यांना सोबत घेऊन अनिल शर्मा यांनी ‘अपने’ हा चित्रपट बनविला, ज्यात सनी आणि बॉबी पुन्हा बॉक्सिंगच्या रिंगणात उतरतात, मात्र बॉक्स आॅफिसवर या चित्रपटालादेखील मोठे यश मिळाले नाही.
भारत आणि पाकिस्तानच्या संबंधाला बॉक्सिंगच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संजय पूर्ण सिंह चौहान यांनी ‘लाहौर’ चित्रपटातून केला. दर्शकांच्या एका वर्गाने या चित्रपटाची स्तुती केली व आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले. बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर आधारित प्रियांका चोप्राच्या चित्रपटाने नवा इतिहास घडविला. मेरी कोम बॉक्स आॅफिसवर हिट ठरला.
करण जोहरच्या प्रोडक्शनात अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना सोबत घेऊन ‘ब्रदर्स’ चित्रपट बनविला, ज्यात सावत्र भाऊ बॉक्सिंगच्या मैदानात सामना करतात. कित्येक प्रमोशनानंतरदेखील हा चित्रपट यशस्वी झाला नाही. आता यादीत ‘साला खड़ूस’चे नाव जुळले आहे, ज्याची सुरुवात चांगली मानली जात आहे.
- anuj.alankar@lokmat.com