धनुषची होतेय कसरत
By Admin | Updated: January 17, 2015 00:20 IST2015-01-17T00:20:10+5:302015-01-17T00:20:10+5:30
कोलावरी-डी गाण्याने लोकप्रियता मिळवलेला अभिनेता धनुष हा सुपरस्टार रजनीकांतचा जावई आहे.

धनुषची होतेय कसरत
कोलावरी-डी गाण्याने लोकप्रियता मिळवलेला अभिनेता धनुष हा सुपरस्टार रजनीकांतचा जावई आहे. दक्षिणेत लोकप्रिय असलेला धनुष हिंदी चित्रपटांमध्येही सध्या खूप बिझी आहे. आजच्या अभिनेत्रींना त्याच्याबरोबर काम करायला फार आवडते. या अभिनेत्रींबरोबर सहज वावरणाऱ्या धनुषला मात्र बायकोवर छाप पाडण्यासाठी जाम मेहनत घ्यावी लागतेय. लग्नाला काही वर्षे झाली असली तरी आपण अजूनही पत्नी ऐश्वर्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याची कबुली त्याने नुकतीच दिली.