जन्मली कथा
By Admin | Updated: November 24, 2014 02:31 IST2014-11-24T02:31:59+5:302014-11-24T02:31:59+5:30
‘विटी-दांडू’ हा खेळ प्रत्येक नवीन गोष्ट जाणून घेण्याच्या माझ्या उत्सुकतेचा भाग आहे

जन्मली कथा
‘‘विटी-दांडू’ हा खेळ प्रत्येक नवीन गोष्ट जाणून घेण्याच्या माझ्या उत्सुकतेचा भाग आहे. प्रत्येक गोष्टीमागे नक्कीच काहीतरी इतिहास असतो असे मला नेहमीच वाटत असते. विटी-दांडू हा खेळ कसा निर्माण झाला असेल, त्यामाागील विचारानेच मला कथालेखनासाठी प्रवृत्त केले’’, असे म्हणणे आहे, ‘विटी दांडू’ या चित्रपटाचे कथालेखक-अभिनेता विकास कदम याचे ‘विटी दांडू’ या चित्रपटाच्या माध्यमातून विकास लेखक आणि कला दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे. विकासने सांगितले, ‘विटी-दांडू’ हा मराठी मातीत रूजलेला खेळ आहे, त्यामुळे त्याला मराठीचा बाज असणे आवश्यक होते. अजयला हा चित्रपट हिंदीत करण्याची इच्छा होती. मात्र मला मराठीतच व्हावासा वाटत होते. या विषयाला दृश्यात्मकतेचा फिल मला द्यायचा होता, आणि तो देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. या चित्रपटाचा टे्रलर विविध वाहिन्यांवरून प्रदर्शित होत असल्याचे पाहून हा चित्रपट सबटायटल्ससह इतर प्रादेशिक भाषांमध्येही डबिंग करण्याची विचारणाही केली जात असल्याचे विकास अभिमानाने सांगतो.