"तिच्याशी बोलावं लागेल...", लेक अंशुला कपूरने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:12 IST2025-07-07T14:12:34+5:302025-07-07T14:12:58+5:30

अंशुलाने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

boney kapoor first reaction after daughter anshula kapoor gets engaged with bf rohan thakkar | "तिच्याशी बोलावं लागेल...", लेक अंशुला कपूरने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

"तिच्याशी बोलावं लागेल...", लेक अंशुला कपूरने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अर्जुन कपूरची बहीण आणि बोनी कपूर यांची लेक अंशुला कपूर हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. अंशुलाने बॉयफ्रेंड रोहन ठक्करसोबत न्यूयॉर्कमध्ये साखरपुडा केला. रोहनने अंशुलाला न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कमध्ये फिल्मी स्टाइलने प्रपोज केलं होतं. अंशुलाने तिच्या सोशल मीडियावरुन साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. अंशुलाने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

लेकीच्या साखरपुड्यानंतर बोनी कपूर खूश आहेत. "मी खूप खूश आणि उत्साहित आहे. हा सगळ्यात चांगला दिवस होता. माझी आई असताना हे सगळं व्हायला हवं होतं. जेव्हा मला याबाबत कळलं तेव्हा मला खूप आनंद झाला. गेल्या काही दिवसांतील ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे. आम्ही त्यांच्या परतण्याची वाट पाहत आहोत. जेणेकरून आम्हाला त्यांच्या लग्नाची तारीख ठरवता येईल. यासाठी त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे", असं बोनी कपूर म्हणाले. 


अंशुला कपूर ही बोनी कपूर यांची पहिली पत्नी मौना शौरी यांची मुलगी आहे. बोनी कपूर आणि मौना शौरी यांनी १९८३ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना अर्जुन आणि अंशुला ही दोन मुलं आहे. अर्जुन कपूर बॉलिवूडमध्ये करियर करत आहे. तर अंशुलाने वेगळी वाट निवडली. बोनी कपूर यांनी लग्नानंतर १३ वर्षांनी मौना शौरी यांना घटस्फोट दिला. त्यानंतर त्यांनी श्रीदेवीशी लग्न करत संसार थाटला होता. त्यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. 

Web Title: boney kapoor first reaction after daughter anshula kapoor gets engaged with bf rohan thakkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.